इंग्लंड आणि पाकिस्तान या संघात मुलतान येथे खेळल्या गेलल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात मिळालेल्या 355 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 328 धावा करता आल्या. इंग्लंडसाठी मार्क वुड याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. हा सामना संपल्यानंतर खेळाडूवृत्तीला गालबोट लावणारी घटना घडली. जेव्हा इंग्लंडचा कर्णधार पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अली याच्याशी हात मिळवण्यासाठी आला तेव्हा त्याने नकार दिला.
पाकिस्तानचा संघ आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करत होता. अगा सलमान (Agha Salman) आणि मोहम्मद अली (Mohammad Ali) शेवटच्या विकेटसाठी झटपट धावा करण्याचा प्रयत्न करत होते. सलमान जलदरीत्या धावा करत होता. अशातच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने गोलंदाजीत परिवर्तन केले आणि रॉबिन्सन याला गोलंदाजीसाठी आणले. रॉबिन्सन याने पहिल्याच चेंडूवर अलीला यष्टीरक्षक ओली पोप याच्या हातून झेलबाद केेले. ही विकेट मिळाल्यानंतर इंग्लंड संघाने जल्लोष केला आणि अशातच स्टोक्सने अली याच्याशी हातमिळवणी करण्यासाठी पुढे आला. मात्र, अलीने हात मिळवण्यास नकार दिला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 12, 2022
इंग्लंडने अपील केल्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पाकिस्तानी फलंदाज देखील पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होता, तेवढ्यात स्टोक्स त्याच्याजवळ आला आणि हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. जेव्हा स्टोक्स हात मिळवण्यासाठी पुढे आला तेव्हा तो स्टोक्सला काहीतरी बोलला. कदााचित ते हे असेल की, पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. अलीने काही बोलल्यानंतर स्टोक्सने देखील पंचांकडे पाहिले आणि मग निघून गेेला. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषीत केेले.
इंग्लंडने या सामन्यात पहिल्या डावात 281 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान संघ 202 धावांवर गारद केला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडे 79 धावांची आघाडी होती. इंग्लंडने नंतर 275 धावा करत पाकिस्तानला 355 धावांचे आव्हान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा कर्णधारही पडला ‘बॅझबॉल’च्या प्रेमात! म्हणाला, “हेच क्रिकेट पाहायला आवडतं”
स्टोक्सला आपला युवा फलंदाज वाटतोय दुसरा विराट; पाकिस्तानला चोप-चोप चोपलंय