माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ट्विटरवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. 1999 च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा जुना व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 2.20 मिनिटांच्या या व्हिडिओसोबत अझर यांनी जे लिहिले आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयांचे मन ते जिंकून घेतील.
भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये 1999 च्या विश्वचषक स्पर्धेचा सामना 8 जून रोजी झाला होता. या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून भारताने विजयाची हॅट्रीक पूर्ण होती. अझरुद्दीन यांनी या व्हिडिओसोबत सांगितले की, ‘आम्ही सामना जेव्हा खेळत होतो तेव्हा दुसऱ्या बाजूला कारगिलचे युद्ध चालू होते.’
अझरुद्दीन यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘8 जून 1999 ला भारतीय संघाने पाकिस्तानच्या विरुद्ध विश्वचषक स्पर्धेत विजयाची हॅट्रीक पूर्ण केली होती. ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर पाकिस्तान आणि भारतीय संघांमध्ये हा उत्कंठावर्धक तसेच कमी लक्ष असलेला सामना झाला होता. या सामन्याच्या वेळी कारगिलचे युद्ध आपल्या चरमसीमेवर होते. आमच्यासाठी हा सामना खास होता. कारण हा विजय आमच्या सैनिकांना समर्पित होता.’
अजहर यांनी पुढे लिहिले की, ‘सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांच्या चांगल्या प्रदर्शनानंतर मी देखील अर्धशतकी खेळी करून आनंदी होतो. त्यानंतर वंकटेश प्रसादने शानदार गोलंदाजी केली. जगवाल श्रीनाथने सुरुवातीला पाकिस्तानी फलंदाजांना धक्के दिले, तसेच अनिल कुंबळे आणि देवाशीष मोहंती यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. सोबतच 2 अचूक झेल पकडण्याचा आनंद देखील होता.’
https://twitter.com/azharflicks/status/1402172815827095552?s=20
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करतांना 227 धावा केल्या होत्या. सचिन 45 आणि द्रविडने 61 धावांची खेळी केली होती. त्यानंतर अझरुद्दीनने देखील 59 धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला प्रतिउत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ फक्त 180 धावांवर गारद झाला होता. प्रसादने 5, श्रीनाथने 3 आणि कुंबळेने 2 बळी घेतले होते. अशाप्रकारे भारताने एकूण 47 धावांनी विजय प्राप्त केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC फायनलवर ‘संकटाचे काळे ढग’, भारतीय फलंदाजांना होऊ शकते मोठे नुकसान!
कसोटी क्रमवारीत भारतीय अष्टपैलूंचा दबदबा; जडेजाची दुसऱ्या स्थानी झेप, तर अश्विन ‘या’ क्रमांकावर कायम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विंडिज संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे पुनरागमन