पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मंगळवारी (९ जून) कोविड-१९ या जागतिक महामारीच्या संक्रमनाची चिंता लक्षात घेता इंग्लंड दौऱ्यापुर्वी होणारा राष्ट्रीय पुरुष संघाचा प्रशिक्षण शिबीर (ट्रेंनिंग कँप) आयोजित केला नाही. पीसीबीने सांगितले की, “येत्या काही आठवड्यात कोविड-१९ च्या धोक्याला लक्षात घेता खेळाडूंना सुरक्षित वातावरणात ठेवणे हा आमच्यापुढील सर्वात मोठा संघर्ष आहे. त्यामुळे आम्ही इंग्लंड दौऱ्यापुर्वी घेतला जाणारा प्रशिक्षण शिबीर आयोजित केलेला नाही.”
पीसीबीने सुरक्षित वातावरणाच्या मुद्द्याला जास्त महत्त्व दिले आहे. कारण, लाहोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या रहिवासी परिसरामध्ये खोल्यांची कमतरता आहे. त्यामुळे जास्त खेळाडूंना एकत्र खोलीत रहावे लागेल आणि महामारीचा धोका वाढू शकतो.
एकीकडे ही बाब लक्षात घेत पीसीबीने प्रशिक्षण शिबीर रद्द केले आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनचे त्याच्या मित्रांसोबत पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हसनैन आपल्या मित्रांसोबत बीबीक्यू पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. तो त्याच्या मित्रांसोबत तंदूरवर कबाब बनवताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, हसनैन आणि त्याच्या मित्रांनी मास्क लावलेला नाही. त्यामुळे अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
https://www.instagram.com/p/CBL2z44pXAG/?utm_source=ig_web_button_share_sheet
हसनैनने मार्च २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ५ वनडे सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत. तर, ६ टी२० सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
क्रिकेटर वडिलांच्या बायोपिकमधून बाॅलीवूड पदार्पण करणार ‘या’ माजी कर्णधाराची मुलगी
म्हणून शोएब अख्तरला मारायला आले होते ६ मोठे क्रिकेटपटू
जुने दिवस परतणार! इंग्लंड या दोन देशांना घेऊन भरवणार…