टी२० विश्वचषकात पाकिस्तानने मंगळवारी (२ नोव्हेंबर) नामिबियावर ४५ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा हा विश्वचषकातील सलग चौथा विजय होता आणि या विजयासह संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नामिबियाने या सामन्यात पाकिस्तान संघाला आव्हान देण्याचा चांगला प्रयत्न केला, पण शेवटी पाकिस्तानने नामिबियाला नमवले आणि सामना जिंकला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने संघालाची उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याचसोबत तो यष्टीरक्षण करतानाही चांगल्या अंदाजात दिसला. दरम्यान, यष्टीरक्षण करताना रिजवान एक असे भाकित केले, जे पुढच्याच चेंडूव खरे ठरले.
रिजवानने यष्टीरक्षण करत असताना खेळपट्टीवर खेळत असलेला फलंदाज बाद होण्याविषयी भविष्यवाणी केली आणि ती भविष्यवाणी पुढच्याच चेंडूवर खरी ठरली. पाकिस्तानचा शादाब खान नामिबियाच्या डावाच्या १४ व्या षटकात गोलंदाजी करत होता. शादाबच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नामिबियाचा क्रेग विलियम्स ४० धावांसह खेळपट्टीवर कायम होता. अशात रिजवानने या चेंडूवर क्रेग बाद होणार असच्याचे म्हटले आणि ते खरे ठरले.
क्रेगने षटकाच्या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. अशात यष्टीरक्षण करणारा रिजवान म्हणला की, “हा बाद होणार आहे या चेंडूवर.” रिजवानने केलेले हे भाकित स्टंप्सच्या माइकमध्ये कैद झाले आणि ते स्पष्ट ऐकू येत आहे. षटाकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाजी करत असलेला क्रेग मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात दिसला, पण तो चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्यात अपयशी ठरला. क्रेग चेंडूला योग्यप्रकारे टाईम करू शकला नाही आणि चेंडू बॅटला लागून हवेत उडाला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला हसन अलीने कसलीही चूक न करता तो चेंडू आरामात झेलला आणि क्रेग विलियम्सला तंबूत परतावे लागले.
https://twitter.com/rishobpuant/status/1455587219658346496
दरम्यान, सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि त्यांनी मर्यादित २० षटकांमध्ये २ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. यामध्ये त्यांचे सलामीवीर बाबर आजम (७०) आणि मोहम्मद रिजवान (७९) यांनी महत्वाची भागीदारी पार पाडली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली.
प्रत्युत्तरात नामिबिया संघ २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावा करू शकला. परिणामी पाकिस्तानने सामना ४५ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर कामगिरी! टी२० सामन्यात ८ पेक्षा कमी चेंडू खेळूनही ‘मॅन ऑफ द मॅच’ बनणारे ३ फलंदाज
अफगाणिस्तानविरुद्ध रोहितची बॅट तळपली, तर टी२०च्या ‘या’ विक्रमात मारेल बाजी; बनेल केवळ दुसरा भारतीय
विक्रम राठोड पुन्हा टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यास उत्सुक; म्हणाले, ‘अजून खूप काम बाकी’






