दुखापती असल्यामुळे मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आले नसले तरी, त्याला बंगालच्या रणजी संघात स्थान मिळाले. ज्यात त्याने दमदार कामगिरी केली. आता त्याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल संघातही समावेश करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगाल टी20 संघात शमीचा समावेश करण्यात आले आहे. ज्यामुळे त्याचा टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर, मोहम्मद शमीने वर्षभरानंतर स्पर्धात्मक सामन्यात पुनरागमन करत, मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी सामन्यात बंगालसाठी प्रभावी कामगिरी केली आणि आपल्या संघाला हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. असे समजते की राष्ट्रीय निवड समितीला, बऱ्याच दिवसानंतर दुखापतीतून कमबॅक केल्यानंतर केवळ एका रणजी सामन्यानंतर शमीचा भारतीय संघात घाईघाईने समावेश करून कोणतीही जोखीम पत्करायची नव्हती.
अहवालानुसार, बीसीसीआय वैद्यकीय संघ आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांची इच्छा आहे की शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आणखी काही स्पर्धात्मक सामने खेळावेत आणि इतक्या सामन्यांनंतर त्याचे शरीर ठीक आहे की नाही हे पाहावे. आता जर मोहम्मद शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.
प्रतिभावान फलंदाज सुदीप कुमार घरमीला बंगालचा कर्णधार बनवण्यात आले. बंगालचा संघ राजकोट येथे अ गटातील सामन्यात पंजाबविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या दोन संघांव्यतिरिक्त अ गटात हैदराबाद, मेघालय, मध्य प्रदेश, मिझोराम, बिहार आणि राजस्थानचे संघ आहेत. त्याचा अंतिम सामना 15 डिसेंबरला बेंगळुरू येथे होणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल संघ
सुदीप कुमार घारामी (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, करण लाल, हृतिक चॅटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, शाकीर हबीब गांधी (यष्टीरक्षक), रणज्योत सिंग खैरा, प्रेयस रे बर्मन, अग्नि पनवी (विकेटकीपर), प्रदिप्ता प्रामाणिक, सक्षम चौधरी, मोहम्मद शमी, इशान पोरेल, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल, सायन घोष, कनिष्क सेठ आणि सौम्यदीप मंडल
हेही वाचा-
IND vs AUS; पर्थ कसोटीत विराट कोहली रचणार इतिहास!
IPL Auction; किती खेळाडूंवर लागणार बोली? सर्व खेळाडू विकले जाणार? जाणून घ्या एक क्लिकवर
‘या’ दिवशी होणार चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत की पाकिस्तान कोणाचा पत्ता कटणार?