---Advertisement---

गोलंदाजीनंतर मोहम्मद शमीचा फलंदाजीतही कहर! या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 1:51 PM
Mohammed Shami
---Advertisement---

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो त्याचा फिटनेस सिद्ध करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. शमी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून खेळत असून तेथे गोलंदाजीत त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आता मात्र त्यानं फलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे! शमीनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अनुभवी गोलंदाजाची जोरदार धुलाई केली.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चंदीगडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात शमीनं 188 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी करत वेगवान गोलंदाज संदीप शर्माला फोडून काढलं. शमीनं अवघ्या 17 चेंडूत 32 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शमीनं यापूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली होती. आता त्यानं फलंदाजीतही कमाल करून तो भारतीय संघात पुनरागमनासाठी तयार असल्याचं सिद्ध केलं आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी राजस्थान रॉयल्सनं संदीप शर्माला 4 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. तर मोहम्मद शमीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याला मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादनं 10 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं आहे. शमी दुखापतीमुळे आयपीएल 2024 चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता.

दुखापतीनंतर पुनरागमन करताना शमीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चमकदार कामगिरी केली आहे. शमीनं 2023 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला वर्षभराहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं. आता सर्वांनाच त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. फिटनेसबाबत त्याला एनसीएकडून क्लीन चिट मिळताच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतो. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं देखील शमीच्या संघातील पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा – 

भारताचा हा अष्टपैलू खेळाडू लवकरच ‘डॉक्टर’ बनणार! लिलावात मिळाली होती मोठी रक्कम
तिसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का! स्टार खेळाडू बाहेर, मालिका गमावण्याचा धोका?
बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---