---Advertisement---

३०० विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीने एवढ्या फलंदाजांना केले आहे क्लीन बोल्ड!

On: मंगळवार, ऑक्टोबर 15, 2019 3:54 PM
---Advertisement---

10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 1 डाव 137 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. त्यामुळे शमी भारताकडून 300 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा 11 वा गोलंदाज ठरला आहे.

शमीने या 300 विकेट्सपैकी 182 विकेट्स झेलच्या स्वरुपात घेतले आहेत. तसेच त्याने 86 फलंदाजांना त्रिफळाचीत केले आहे आणि 32 फलंदाजांना पायचीत बाद केले आहे. असे मिळून त्याने एकूण 300 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या 192 फलंदाजांना आणि 108 डावकरी फलंदाजांना बाद केले आहे.

या 300 विकेट्सपैकी शमीने 161 विकेट्स कसोटीमध्ये 131 विकेट्स वनडेमध्ये आणि 8 विकेट्स आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये घेतल्या आहेत. तसेच शमी भारताकडून वनडेत सर्वात जलद 100 विकेट्स घेणाराही गोलंदाज आहे. त्याने 56 वनडे सामन्यात 100 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

मोहम्मद शमीच्या 300 आंतरराष्ट्रीय विकेट्स –

झेल – 182

त्रिफळाचीत – 86

पायचीत – 32

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---