भारतीय संघाला सध्या मोहम्मद शमीची उणीव भासत आहे. सर्वांना त्याला ऑस्ट्रेलियात किलर बॉलिंग करताना पाहायचंय. परंतु निवडकर्त्यांचा मनात काहीतरी वेगळच आहे. वास्तविक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून शमीनं चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु त्याला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. मात्र शमीचा विश्वास आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त झालाय.
दरम्यान, मोहम्मद शमीला शनिवारी (21 डिसेंबर) हैदराबादमध्ये होणाऱ्या दिल्ली विरुद्ध बंगाल विजय हजारे करंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं (CAB) गुरुवारी ही घोषणा केली. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून शेवटचा सामना खेळलेला शमी घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळापासून संघाबाहेर आहे. तो बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावरला. त्यानंतर त्यानं बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं. त्यानं सात विकेट्स घेत संघाला या रणजी ट्रॉफी हंगामात पहिला विजय मिळवून दिला. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्यानं नऊ विकेट्स घेतल्या.
देशांतर्गत टी20 स्पर्धेदरम्यान शमीच्या गुडघ्याला आलेली सूज हा अजूनही चिंतेचा विषय आहे. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर शमीच्या उपलब्धतेबद्दल विचारलं असता रोहित शर्मा रागावलेला दिसला. तो म्हणाला, “मला वाटतं की एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) मधील कोणीतरी तो कुठे रिहाब करत आहे याबद्दल त्याच्याशी बोललं पाहिजे. त्या लोकांनी येऊन आम्हाला काही अपडेट्स द्यायला हवेत.”
रोहित म्हणाला, “मला समजलं आहे की तो घरच्या मैदानावर खूप क्रिकेट खेळत आहे, पण त्याच्या गुडघ्याबद्दलही काही शंका आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये शमीचा सहभाग चॅम्पियन्स ट्रॉफीसह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याची उपलब्धता निश्चित करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असेल, म्हणून त्याच्या फिटनेसबद्दल 200 टक्के खात्री होईपर्यंत आम्ही कोणतीही जोखीम घेणार नाही.”
हेही वाचा –
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया! जेतेपदासाठी या खतरनाक संघाशी लढत
प्रीतीला पाहताक्षणी 13 वर्षाचा अश्विन प्रेमात पडला होता! जाणून घ्या क्रिकेटच्या ‘अण्णा’ची फिल्मी लव्ह स्टोरी
“तेव्हा विराट कोहली अक्षरश: रडणार होता…”, बॉलिवूड अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा