मँचेस्टर। गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात भारताने विंडीज विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवून या स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात मोहम्मद शमीने 6.2 षटके गोलंदाजी करताना 16 धावा देत 4 विकेट्स घेउन महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याच्या या कामगिरीबरोबरच त्याने या सामन्यात विंडीजचा शेल्डन कॉट्रेल बाद झाल्यानंतर सलामी ठोकत केलेल्या सेलिब्रेशन मोठी चर्चा झाली आहे. शमीबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही असे सेलिब्रेशन केले.
कॉट्रेल हा जेव्हाही गोलंदाजी करताना विकेट घेतो तेव्हा तो सलामी ठोकत सेलिब्रेशन करतो. त्यामुळे तो बाद झाल्यानंतर त्याच्याच सलामीच्या सेलिब्रशनचे अनुकरण विराट आणि शमीने केले.
ही घटना भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 30 व्या षटकात कॉट्रेलला पायचित बाद केल्यानंतर घडली. त्याची विकेट गेल्यानंतर शमीने कॉट्रेलच्या सलामीचे अनुकरण केले, तर विराटने कॉट्रेलच्या सलामी देण्याच्या सेलिब्रेशनच्या शेवटच्या भागाचे अनुकरण केले. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विंडीजकडून गोलंदाजीत केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
त्यानंतर भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 143 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना हा पराभव स्विकारावा लागला. तसेच या पराभवामुळे त्यांचे या विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.
https://twitter.com/BharatUniverse/status/1144474355398635522
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीला पाठिंबा देत कर्णधार कोहलीने असे केले कौतुक
–…म्हणून रोहित शर्माच्या विकेटची होत आहे सर्वाधिक चर्चा
–अर्धशतकी खेळी करत एमएस धोनीने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी