एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आपला नवीन व्यवसाय सुरु केला आहे. शमी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही. परंतु या वेळेचा तो पुरेपुर वापर करताना दिसत आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपण व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली आहे.
नक्की कुठला व्यवसाय सुरू केलाय शमीने ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी याच्या बोटाला दुखापत झाली होती. याच कारणास्तव तो संघाबाहेर झाला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यातूनही संघाबाहेर असताना त्याने वेळेचा पुरेपूर वापर करत नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्याने पितळाच्या धातूपासून बनविण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. पितळाची वस्तू स्वच्छ करतानाचे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये आपल्या व्यवसायाची जाहीरात केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://www.instagram.com/p/CKwXWAglpLV/?utm_source=ig_web_button_share_sheet
हसीन जहांने मोहम्मद शमीला पुन्हा दिला झटका
मोहम्मद शमी याचा २०१४ साली हसीन जहां हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यातले वैयक्तिक वाद हे सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते. हसीन जहां हीने मोहम्मद शमीवर आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांचा हा वाद न्यायालयात सुद्धा गेला होता. नुकताच आपल्या मुलीचा एक फोटो शेअर करत तिच्या नावापुढे तिने आपले आडनाव देऊन स्पष्ट केले होते की, तिच्या ( हसीन जहां) आणि मुलीच्या आयुष्यात मोहम्मद शमीसाठी स्थान नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘छम्मा छम्मा’ गाण्यावर धरला युझवेंद्र चहलच्या बायकोने ठेका, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
भारतीय क्रिकेटपटूंना ‘धोबी का कुत्ता’ संबोधणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई
भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता