भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मालिका गमावली आहे. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ६६ धावांनी, तर दुसर्या सामन्यात ५१ धावांनी पराभूत केले. दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांची तुफान धुलाई झाली. सर्व भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी हा काहीशी बरी कामगिरी करू शकला. बुधवारी (२ डिसेंबर) होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात शमी १८ वर्षांपूर्वीचा एक विक्रम आपल्या नावे करू शकतो.
मोडू शकतो अजित आगरकरचा विक्रम
गेल्या काही वर्षांपासून शमी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी बजावताना दिसून येतोय. तो बुमराहसोबत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. असे असूनही, शमीच्या गोलंदाजी आकडेवारीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. तो वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असून, अजित आगरकरचा १८ वर्ष जुना विक्रम मोडण्यापासून आता तो फक्त दोन बळी दूर आहे. शमीने आतापर्यंत ७९ वनडे सामन्यात १४८ बळी मिळवले असून, कॅनबेरामध्ये त्याला सर्वात जलद १५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याची संधी आहे.
दिग्गजांच्या यादीत होईल समाविष्ट
शमीने अखेरच्या वनडे सामन्यात दोन बळी मिळवल्यास त्याचे १५० वनडे बळी पूर्ण होतील. या दोन बळींसह तो भारतातर्फे सर्वात जलद १५० बळी घेणारा गोलंदाज होईल. सोबतच, मिचेल स्टार्क व सकलेन मुश्ताक यांच्यापाठोपाठ तो सर्वात कमी सामना खेळून १५० बळी मिळवण्याची कामगिरी करू शकतो. स्टार्क व मुश्ताक यांनी अनुक्रमे ७७ व ७९ सामन्यात ही कामगिरी केली होती. भारतातर्फे सर्वात जलद १५० वनडे बळी मिळवण्याची कामगिरी अजित आगरकरने केली होती. त्याने १५० बळी मिळवण्यासाठी ९७ वनडे सामने खेळले होते.
भारतीय गोलंदाजांनी केली आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब गोलंदाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशा फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धावांची खैरात वाटली. पहिल्या सामन्यात शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करताना तीन बळी मिळवले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो देखील महागडा ठरला. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला प्रतिष्ठेसाठी खेळावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून भारताकडे कामचलाऊ गोलंदाजांची कमतरता’, माजी यष्टीरक्षक फलंदाजाने सांगितली समस्या
पती असावा तर असा! विराटने पत्नी अनुष्काला शिकवले ‘शीर्षासन’
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज