---Advertisement---

“प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित…”, पुनरागमनानंतर मोहम्मद शमी भावूक, पहिली प्रतिक्रिया समोर

---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जवळपास वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने गुरुवारी (14 नोव्होंबर) झालेल्या रणजी सामन्यात चार बळी घेत दुखापतीतून शानदार पुनरागमन केले. एका वर्षाहून अधिक काळानंतर लाल चेंडूचा पहिला सामना खेळणाऱ्या शमीने बंगालकडून खेळताना मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात चार बळी घेतले. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीने गुरुवारी आपल्या दमदार पुनरागमनाचे श्रेय चाहत्यांना दिले आहे. ज्यांच्या प्रेमामुळे तो पुन्हा मैदानात परतला आहे.

मोहम्मद शमीने पोस्ट करत लिहिले की, “अखेर प्रतीक्षा संपली.” 360 दिवसांनंतर, मी आणखी मजबूत आणि अधिक भुकेने मैदानावर परतलो आहे. रणजीमध्ये बंगालच्या चार विकेट आणि ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक चेंडू, प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित आहे, माझे अद्भुत चाहते, तुमचे प्रेम माझ्या उत्कटतेला उत्तेजन देते! हा हंगाम अविस्मरणीय बनेल!”

गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 च्या फायनलपासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असलेल्या शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. ज्यासाठी त्याला ऑपरेशन करावे लागले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर जवळपास वर्षभरात प्रथमच स्पर्धात्मक सामना खेळणाऱ्या शमीला रणजी ट्राॅफीच्या सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध मैदानात उतरला. ज्यात त्याने 19 षटकांत 54 धावांत चार विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये बंगालने पहिल्या डावात आघाडी घेतली.

हेही वाचा-

सेहवाग-रोहितपेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, हा कसोटी सामना शेवटचा
आनंदाची बातमी! मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो, फक्त हे निकष पूर्ण करावे लागतील
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची चिंता वाढली! धडाकेबाज फलंदाज दुखापतग्रस्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---