एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाला कांगारुंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. मात्र या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपूर्वीचे सर्व सामने जिंकले होते. भारतीय संघाच्या यशात फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांचेही मोठे योगदान होते. विशेषत: जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. मोहम्मद शमीने या स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर राहिला.
अलीकडेच CAB (बंगाल क्रिकेट बोर्ड) ने मोहम्मद शमीचा गौरव केला. आता मोहम्मद शमीने इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर करून बंगाल क्रिकेटचे आभार मानले आहेत. बंगाल क्रिकेट बोर्डाने कठीण काळात कशी मदत केली हेही त्यांनी सांगितले. मोहम्मद शमीने एक इंस्टाग्राम व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, हे असे क्षण आहेत की मी हा प्रवास का सुरू केला याची मला जाणीव होते. या अतुलनीय पाठिंब्याबद्दल बंगाल क्रिकेट बोर्डाचे आभार. तुमचा पाठिंबा मला नेहमीच चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
View this post on Instagram
मोहम्मद शमी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र बांग्लादेशविरुद्ध हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले होते. याशिवाय या स्पर्धेत एकदाच 4 बळी घेण्याचा पराक्रम केला. मात्र मोहम्मद शमी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपपासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र तो लवकरच मैदानात परतू शकतो. असे मानले जात आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या पुनरागमनाबाबत वक्तव्य केला होता. तो म्हणाला होता की, मी पूर्णपणे फीट झाल्यानंतर मैदानात पुनरागमन करु शकतो. वास्तविक मीडिया रिपोर्ट्सनुसार आता शमीचे भारतीय संघात ऑस्ट्रेलिया दाैऱ्यादरम्यान कमबॅक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितच्या सलामी जोडीदाराने वाढवले टेंशन, बुमराहने 2 वेळा केले बोल्ड
6 विकेट्स घेताच जडेजाची खास क्लबमध्ये एंट्री; अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा भारतीय क्रिकेटपटू
“सर्वात वेगवान 50 पासून 500 विकेट्सपर्यंतचा विक्रम”, वाढदिवसादिनी जाणून घ्या दिग्गज फिरकीपटूचे खास रेकाॅर्ड्स