क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या आहेत.
या डावातही भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठ्या धावा करण्यात अपयश आले. त्याला 14 धावांवर कॉलिन डी ग्रँडहोमने पायचीत केले. त्यामुळे विराटसाठी ही कसोटी मालिका फलंदाज म्हणून अपयशी ठरली आहे.
या कसोटी मालिकेत विराटला 4 डावात मिळून 9.50 च्या सरासरीने केवळ 38 धावा करता आल्या आहेत. विशेष म्हणजे भारताकडून या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही विराटपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शमीने आत्तापर्यंत या कसोटी मालिकेत 3 डावात 19.50 च्या सरासरीने 39 धावा केल्या आहेत.
या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट 38 धावांसह 8 व्या क्रमांकावर आहे. भारताकडून आत्तापर्यंत या मालिकेत सर्वाधिक धावा मयंक अगरवालने केल्या आहेत. त्याने 4 डावात 25.50 च्या सरासरीने 102 धावा केल्या आहेत.
कसोटी मालिकेत 20 धावांचा टप्पा ओलांडण्यातही अपयश –
या मालिकेत 2 सामने खेळताना विराटने 4 डावात अनुक्रमे 2, 19, 3, 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे असे विराटच्या कारकिर्दी असे दुसऱ्यांदाच झाले की 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने एकदाही 20 धावांचा टप्पा न ओलांडला नाही. याआधी 2017 ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत विराटला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता.
दुसरी कसोटी: शमी, बुमराह गोलंदाजीत चमकले मात्र भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी
वाचा????https://t.co/I8gzkSq8pb????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
या स्टेडियमवर होणार महिला आयपीएलचे सामने; नवीन संघाचीही झाली घोषणा
वाचा????https://t.co/E89JPPpVR6????#म #मराठी #Cricket #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020






