रोहित शर्मा (Rohit Sharma), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनेक वर्षांपासून एकत्र क्रिकेट खेळत आहेत. तिघेही एकमेकांना चांगले ओळखतात. भारतीय संघाचे काही खेळाडू बुधवारी (21 ऑगस्ट) एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान शमी आणि अय्यर यांनी रोहितची पोलखोल केली आणि त्याला राग का येतो व तो त्याचा राग कसा व्यक्त करतो, याबद्दल सांगितले आहे. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये शमी म्हणतोय, “सर्वप्रथम रोहित भाई संघात सर्वांना स्वातंत्र्य देतो. त्याच्याबद्दल ही सर्वात चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही त्याच्या अपेक्षांवर खरे उतरत नसाल, तर त्याच्या प्रतिक्रिया थोड्या दिसायला लागतात. तो तुम्हाला सांगेल की तुम्ही हे करायला हवे होते किंवा ते करण्यासाठी तुम्ही आणखी काय करायला हवे होते. पण तरीही तुम्ही त्याच्या अपेक्षे प्रमाणे ते बरोबर करू शकत नसाल, तर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते आम्ही स्क्रीनवर बघूनच समजून घेतो.”
दरम्यान, याच व्हिडीओमध्ये अय्यरने शमीशी सहमती दर्शवली आणि शमी भाई बरोबर असल्याचे सांगितले. अय्यर म्हणाला, “रोहित काही बोलत नाही. आम्हाला रिक्त जागा भरल्यासारखे वाटते. पण ते कोणाला काय आणि कसे सांगत आहे, हे सगळं आम्हाला बघून समजतं. कारण इतकी वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत. त्यामुळे रोहित भाईने काही बोलण्याआधीच आम्हाला त्याच्या मनातलं कळते.”
View this post on Instagram
श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीच्या भाष्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रोहित शर्मा म्हणाला, “मी नेहमी त्यांना मैदानावर इतर कुणासारखं वागण्यापेक्षा स्वतः जसे आहात, तसे राहायला सांगतो. यासाठी सर्वप्रथम मला स्वतः मैदानात उतरावे लागेल. मला आता एवढेच सांगायचे आहे.”
हेही वाचा –
चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री