---Advertisement---

हसीन जहाॅंने शेअर केला व्हिडीओ, चाहते म्हणतात पती शमी व मुलीची तरी लाज ठेव

On: शनिवार, मे 16, 2020 7:33 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाॅं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. खरंतर हसीन आपल्या अकाऊंटवरून ज्याप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत आहे ते पाहून शमीचे चाहते नाराज झालेले दिसत आहेत.

हसीनने (Hasin Jahan) गुरुवारी (१४ मे) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हसीनचा हा व्हिडिओ मॉडेलिंग शूटचा आहे. त्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये (Bold Look) दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAKJskkAWlw/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सवाल करूं बार-बार कैसे जियूं, नजाकते जिंदगी बोली जैसे दिल चाहे वैसे जियो. खुशी ही तुम्हारी इबादत है खुश रहोगे तो दोनों जहां तुम्हारी है।” हसीनने असे कॅप्शन त्या लोकांसाठी लिहिले आहे, जे नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडिओवर चूकीच्या कमेंट्स करतात. तसेच तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करतात.

असे असले तरीही अनेक लोकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांंनी विचित्र प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने तर लिहिले की, कमीत कमी शमी (Mohammed Shami) आणि मुलीची तरी लाज ठेवायची होती.

हसीन आणि शमी वेगवेगळे राहतात. दोघांमध्ये २०१८मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी हसीनने शमीवर त्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यामुळे शमीचे नाव सध्या अर्जुन पुरस्कारासाठी योग्य नसल्याचे बोलले जात आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-६० दिवसांनी कोहली दिसला मैदानावर, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

-आणि १९ वर्षांचा इरफान पठाण म्हणतं होता, मला पाकिस्तानला पाठवू नका

-टी२० विश्वचषकाबद्दल आहे मोठी बातमी, आता होणार या वेळी स्पर्धेचे आयोजन!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---