आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अनेक वाद आपल्याला पाहायला मिळतात. वाद काही क्रिकेट प्रेमींसाठी नवीन नाही. असेच काही वाद दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीतही पाहायला मिळाले. या सामन्यात रिषभ पंत-रस्सी वॅन दर ड्यूसेन, जसप्रीत बुमराह-मार्को जेन्सन अशा काही खेळाडूंमध्ये वाद झाले. आता डिन एल्गर आणि मोहम्मद सिराज यांच्यातील वादाचाही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 गडी राखून पराभव करून इतिहास रचला. डीन एल्गरच्या कर्णधार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी वाँडरर्स स्टेडियमवर त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य गाठून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, खेळाडूंमधील वादाचे या कसोटीला गालबोट लागले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एल्गर आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यातही वाद झाले.
वास्तविक, हा वाद दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 65व्या षटकात सिराज गोलंदाजी करत असताना झाला. या षटकात एल्गरने सिराजविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. सिराजच्या षटकात एल्गरने चार चौकार मारले. यानंतर सिराज आणि एल्गर यांच्यात वादावादी झाली. दोघांमधील वाद इतका वाढला की, केएल राहुल आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/addicric/status/1479128998491815939
त्याचवेळी, पराभवानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांच्या संघाने पहिल्या डावात 60-70 अधिक धावा करायला हव्या होत्या. संघाची कुठे चुक झाली, ते त्याने सामन्यानंतर सांगितले. सामन्यानंतर केएल राहुल म्हणाला, ‘नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलो. आम्ही किमान 60-70 धावा करायला हव्या होत्या.’
अधिक वाचा – बुमराहशी वाद घातल्याने दिग्गजाने जेन्सनला खडसावले; करून दिली ‘त्या’ घटनेची आठवण
भारताला दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 229 धावा करत 27 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताचा दुसरा डाव 266 धावांवर संपुष्टात आल्याने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 67.4 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे-पुजाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला भारतीय दिग्गज; म्हणाला…
स्टंपवर चेंडू आदळूनही स्टोक्स नॉटआऊट; सचिन म्हणतोय, ‘नवा नियम आला पाहिजे, गोलंदाजांशी प्रामाणिक…!’
स्टोक्स, बटलरसहित इंग्लंडचा शतकवीरही जखमी, इंग्लंड बोर्डाने ‘या’ नव्या खेळाडूला केले सहभागी
व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज