---Advertisement---

पदार्पण वीरांची चपळाई कांगारूंवर पडली भारी, सिराज-गिल जोडीच्या ‘त्या’ एका विकेटने ऑसींचा डाव गडगडला

On: शनिवार, डिसेंबर 26, 2020 11:53 AM
---Advertisement---

बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिजच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत यजमान ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी निवडली. परंतु, पाहुण्या भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. या ऐतिहासिक सामन्यादरम्यान युवा भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला पव्हेलियनला रवाना केले.

सिराज व गिलने मिळून लॅब्यूशानेला केले बाद

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना जो बर्न्स (० धावा), मॅथ्यू वेड (३० धावा) आणि स्टिव्ह स्मिथ (० धावा) यांच्या विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्नस लॅब्यूशाने परिस्थिती लक्षात घेऊन बचावात्मक फलंदाजी करत होता. त्याने ४ चौकारांच्या मदतीने ४८ धावाही केल्या होत्या; पण सिराज आणि गिलमुळे अवघ्या २ धावांनी त्यांचे अर्धशतक हुकले.

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्यातील ५०वे षटक सिराजकडे सोपवले. त्याने १३६ किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने षटकातील तिसरा चेंडू टाकला. फलंदाजी करत असलेल्या लॅब्यूशानेने स्क्वेयर लेगकडे हलकासा शॉट मारला. मात्र त्या बाजूला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या गिलने पटकन डाइव्ह मारत एका हाताने चेंडू पकडला आणि लॅब्यूशाने बाद झाला.

क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी मिळून केलेल्या कामगिरीला पाहून भारतीय खेळाडूंनी त्यांची पाठ थोपटली. तसेच सोशल मीडियावरही त्यांचे कौतुक होत आहे.

पदार्पणाच्या सामन्यात केली प्रशंसनीय कामगिरी

महत्त्वाचे म्हणजे, वेगवान गोलंदाज सिराज आणि फलंदाज गिल यांचा हा भारताकडून पहिलाच कसोटी सामना होता. पृथ्वी शॉ यांच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याऐवजी गिलला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले. यासह गिल भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २९७ वा क्रिकेटपटू ठरला. तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमीच्या दुखापतीमुळे सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणारा २९८ वा क्रिकेटपटू आहे.

 

यापुर्वी एकाच कसोटी सामन्यातून पदार्पण केलेले भारतीय खेळाडू

एकाच सामन्यातून दोन भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी २०१३ साली रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी मिळून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तसेच २००४ मध्ये दिनेश कार्तिक आणि गौतम गंभीर यांनी मिळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Live : दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये, ५२ षटकात ५ बाद १३६ धावा

VIDEO : ‘अंदर ही रखना, ये मारेगा’, यष्टीमागून पंतचा अश्विनला मोलाचा सल्ला अन् पुढच्याच चेंडूवर झालं असं काही

हाश.. वाचला! अंपायरच्या ‘त्या’ इशाऱ्याने वाढवली होती ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हृद्याची धडधड, पाहा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---