भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात अनुभवी सलामी फलंदाज डेविड वॉर्नरचे पुनरागमन झाले. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरकडून सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना उत्तम कामगिरी अपेक्षा होती. मात्र सामन्यातील चौथ्याच षटकात वॉर्नरला तंबूत परतावे लागले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी वॉर्नर 5 धावांवर खेळत होता. वॉर्नर पहिल्या चेंडूपासूनच उत्तम फॉर्ममध्ये जाणवत असल्याने वॉर्नर आता मोठी खेळी उभारणार, असे वाटत होते. मात्र सिराजने टाकलेल्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात तो स्लीपमध्ये उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजाराकडे झेल देत बाद झाला.
वॉर्नरने 8 चेंडूचा सामना करत केवळ 5 धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर सिराजने तोंडावर बोट ठेऊन जोरदार सेलिब्रेशन केले.
India off to a good start as Siraj dismisses Warner for 5 #AUSvIND pic.twitter.com/5IPcYkmbvb
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) January 6, 2021
भारतीय संघाला पहिला बळी मिळाल्यानंतर संपूर्ण संघ जोशात जाणवत होता. मात्र अशातच पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पहिल्या सत्रात केवळ 7.1 षटकांचा खेळ झाला असून ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावतात 21 धावा केलेल्या आहेत. विल पुकोवस्की 14 तर मार्नस लॅब्यूशाने 2 धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
नवदीप सैनीने केले आपले कसोटी पदार्पण, ‘या’ दिग्गजाकडून मिळाली कॅप
ऑस्ट्रेलियाकडून २२ वर्षीय खेळाडूचे झाले कसोटी पदार्पण, पाहा कशी आहे कामगिरी
IND v AUS : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय; असे आहेत दोन्ही संघ