---Advertisement---

‘रोहित भाई आला आणि त्याने मला…,’ सिराजने केली तक्रार; पाहा विमान प्रवासातील तो प्रसंग

---Advertisement---

क्रिकेटप्रेमींना सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. १८ ते २२ जून या कालावधीत इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा सामना रंगणार आहे. तत्पुर्वी गुरुवार (३ जून) रोजी भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. भारत ते इंग्लंड या दिर्घ विमान यात्रेचा खेळाडूंनी पुरेपुर आनंद लुटला.

झोपणे, गप्पा मारणे, मस्ती करणे अशा बऱ्याचशा गोष्टी करत त्यांनी प्रवासातील वेळ घालवला. दरम्यान युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने रोहित शर्माबद्दल एक तक्रार केली.

रोहितने सिराजला झोपू दिले नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाच्या विमान प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या शेवटी सिराज हिटमॅन रोहितविषयी तक्रार करताना म्हणतो, अनुभवी फलंदाज रोहितने त्याला विमानात झोपेच्या वेळी खूप सतावले. त्यामुळे पुन्हा त्याला झोप न लागल्याचे त्याने सांगितले आहे.

सिराज म्हणाला की, “आम्ही आताच हीथ्रोवर (विमानतळ) उतरलो आहोत. येथून आम्हाला हॉटेलपर्यंत जाण्यासाठी २ तासांचा प्रवास करायचा आहे. मी विमानात २ तास झोपलो. परंतु नंतर रोहित भाई आला आणि त्याने मला झोपेतून जागे केले. त्यानंतर मला झोपच आली नाही. विमान खाली उतरण्यापुर्वीच्या २ तासांआधी मला कशीबशी झोप आली होती. मी थोडा थकलो होतो. कारण आम्ही काल खूप धावपळ केली होती. अशात मला आरामाची गरज होती.”

https://twitter.com/BCCI/status/1400680486851080199?s=20

याव्यतिरिक्त भारतीय संघाचे खेळाडू विमान प्रवासात आराम करताना, नाश्ता करताना दिसत आहेत. अनेकांनी प्रवासादरम्यानचे त्यांचे अनुभवही शेअर केले आहेत. शेवटी विमानतळावर उतरल्यानंतर काही वेळाचा बस प्रवास करुन सर्व खेळाडू बेस कॅम्पमध्ये पोहोचतात. त्यानंतर सर्वांना विलगीकरणात पाठवण्यात आल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघाचे ‘ठाकूर आणि गब्बर’; शिखर धवनने शेअर केलेला ‘हा’ फोटो जोरदार व्हायरल

काय सांगता! ब्लाइंड डेटवर गेलेला विराट ‘या’ कारणामुळे केवळ ५ मिनिटात आला पळून, स्वत:च केला खुलासा

केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---