लंडन। सोमवारी (१६ ऑगस्ट) भारताने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून दुसरा सामना लॉर्ड्सवर झाला. या सामन्यात भारताने १५१ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना, भारताचा डाव डगमगला होता. मात्र शेवटच्या फळीतील शमी-बुमराह यांच्या जोडीने अर्धशतकी खेळी करत ९ व्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. ज्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या २९८ वर ८ विकेट असताना. डाव घोषित करण्यात आला. ज्यामुळे इंग्लंडला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले.
यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. इंग्लंड संघाने १ धावांवरच २ विकेट गमावल्या होत्या. विकेट्सचा हा सिलसिला नंतर चालूच राहिला. इंग्लंडचा कोणताही फलंदाज डाव सावरण्यास अयशस्वी ठरला.
यामध्ये भारतीय गोलंदाजांनी अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी करत चांगली सुरुवात केली. दुसऱ्या डावातील ३८ व्या षटकात इंग्लंडची संख्या ९० वर ५ अशी असताना मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. तेव्हा, सिराजने आपल्या पहिल्या चेंडूत मोइन अलीची विकेट घेतली. अगदी त्या नंतरच्या दुसऱ्याच चेंडूवर सिरजने सॅम करनला शून्यावर बाद करत, पहिल्याच चेंडूवर बाद केले. ज्यामुळे सॅम करन दोन्ही डावात पहिल्या चेंडूवर आउट होणारा, आज पर्यंतचा इंग्लंडचा चौथाच फलंदाज ठरला. अशातऱ्हेने करनच्या नावावर एक नको असलेला विक्रम देखील प्रस्थापित झाला.
W 🏃🏽 W 🏃🏽!
Siraj gets two-in-two and we just came back from a running celebration 😌Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #ENGvIND #Siraj pic.twitter.com/J92nItabzU
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 16, 2021
दरम्यान, २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या, इंग्लंड संघाची सुरुवात अतिशय खराब राहिली. कोणताही इंग्लिश खेळाडू इंग्लंडचा डाव सावरू शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीने दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ केवळ १२० धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर बुमराहने ३ विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
–‘देर आए दुरुस्त आए’, लॉर्ड्सच्या विजयानंतर रोहितच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा
–दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला ‘हा’ खेळाडू म्हणतोय, ‘मला मुंबई इंडियन्सकडून खेळायचंय’
–बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक घोषित; ‘या’ दिवशी होणार भारताचे सामने