मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची लढत चालू आहे. भारतीय संघाने शनिवारपासून (२६ डिसेंबर) सुरु झालेल्या या लढतीची सुरुवात दमदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने केली आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९५ धावा केल्या आहेत. दरम्यान भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पणाच्या सामन्यातच कमालीची गोलंदाजी करत करत सर्वांना प्रभावित केले आहे.
कॅमरॉन ग्रीनला केले पायचित
झाले असे की, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन मिळून संघाचा डाव पुढे नेत होते. अशात त्यांची भागिदारी तोडण्यासाठी भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सिराजकडे ६२वे षटक सोपवले. सिराजच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर ग्रीनला धाव घेता आली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर त्याने २ धावा घेतल्या.
त्यानंतर सिराजने षटकातील चौथा चेंडू अत्यंत चपळाईने टाकला आणि तो सरळ जाऊन ग्रीनच्या पॅडला लागला. यावर पंचांनीही ग्रीन पायचित केल्याचे घोषित केले. तरीही ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला मात्र ग्रीनला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. अशाप्रकारे ग्रीन २०.००च्या स्ट्राईक रेटने १२ धावा करत मैदानाबाहेर पडला.
https://twitter.com/cricketcomau/status/1342700465033785345
मार्नस लॅब्यूशाने ठरला सिराजची पहिली कसोटी विकेट
महत्त्वाचे म्हणजे, सिराजची ही या सामन्यातील पहिली विकेट नव्हती. यापुर्वीही त्याने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्नस लॅब्यूशानेचे विकेट घेतली होती. सिराजने ऑस्ट्रेलिया पहिल्या डावातील ५०व्या षटकात लॅब्यूशानेला बाद केले होते. त्याने १३६ किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने ५०व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला. यावर फलंदाजी करत असलेल्या लॅब्यूशानेने स्क्वेयर लेगकडे हलकासा शॉट मारला. मात्र त्या बाजूला क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या शुबमन गिलने पटकन डाइव्ह मारत एका हाताने चेंडू पकडला आणि लॅब्यूशाने बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : भारताच्या दमदार गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर आटोपला
पदार्पण वीरांची चपळाई कांगारूंवर पडली भारी, सिराज-गिल जोडीच्या ‘त्या’ एका विकेटने ऑसींचा डाव गडगडला
मेहनत फळाला आली..! सिराजला टेस्ट कॅप देत आर अश्विनने थोपटली पाठ, पाहा व्हिडिओ






