भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी पर्थ येथे खेळली जात आहे. आतापर्यंतच्या सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेली टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान संघाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात जोरदार बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी सिराज लाबुशेनवर चांगलाच संतापला होता. सिराज आणि लाबुशेन यांच्यातील या वादाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मात्र या दोघांमध्ये असं झालं तरी काय, हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
वास्तविक, मोहम्मद सिराजनं मार्नस लाबुशेनला चेंडू टाकला, जो त्याला समजू शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या अगदी जवळ पडला. यावेळी लाबुशेन क्रीजच्या बाहेर असल्यामुळे सिराजनं त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिराज चेंडूजवळ पोहोचताच लाबुशेननं त्याच्या बॅटनं चेंडू मारला आणि चेंडू दूर गेला.
यावर सिराजनं अंपायरकडे पाहिलं, मात्र त्याला अंपायरकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सिराज आणि लाबुशेन यांच्यात काहीतरी बोलणं झालं, ज्यामुळे वातावरण थोडावेळ तापलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Things are heating up! Siraj and Labuschagne exchange a few words.#INDvsAUS pic.twitter.com/leKRuZi7Hi
— 彡Viя͢ʊs ᴛᴊ ᴘᴇᴛᴇʀ र (@TjPeter2599) November 22, 2024
या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 49.4 षटकांत 150 धावांत गुंडाळला गेला. यादरम्यान संघाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीनं 41 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनं सर्वाधिक 4 बळी घेतले.
हेही वाचा –
नितीश रेड्डीनं भारताची लाज राखली, पदार्पणाच्या कसोटीत धमाल कामगिरी!
IPL; बीसीसीआयचा नवा नियम येताच विदेशी खेळाडूंचा सूर बदलला, पुढील तीन हंगामांसाठी मोठा निर्णय!
800 बळी घेणाऱ्या महान खेळाडूचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास