भारतीय संघाने रविवार, 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. या प्रदर्शनानंतर आगामी टी-20 विश्वचषकासाठी त्याने संघातील त्याची दावेदारी अधिकच भक्कम केली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे आणि भारतीय संघाला त्याच्या बदली खेळाडूच्या रूपात एका चांगल्या गोलंदाजाची आवश्यकता आहे.
आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारताच्या 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला निवडले गेले होते. परंतु दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वीच त्याला दुखापत झाली आणि त्याने या मालिकेतून माघार घेतली. नंतर त्याने बुमराहची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आणि त्याने टी-20 विश्वचषकातून देखील माघार घेतली आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे, पण संघात एका खेळाडूची जागा अजूनही खाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ज्या पद्धतीने खेळला, ते पाहता त्याने या जागेसाठी स्वतःची दावेदार अधिक भक्कम केल्याचे दिसते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या दक्षिण आफ्रिकी संघाने 50 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 278 धावा केल्या. मोहम्मद सिराज भारतासाटी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांमध्ये 38 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट अवघा 3.80 होता, जो एकदिवसीय क्रिकेटच्या मानाने खूपच चांगला म्हणता येईल.
टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहची कमी भरून काढण्यासाठी जी नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत, त्यातील एक म्हणजे मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि दुसरे म्हणजे मोहम्मद सिराज. शमी भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज असला, तरी त्याला मागच्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून टी-20 संघात संधी मिळाली नाहीये. त्याने मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात नामिबिया संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शेवटचा टी-20 सामना खेळला होता. चाहते शमीला पुन्हा एकदा टी-20 संघात पाहण्यासाठी उत्सुकत आहेत. पण दुसरीकडे आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रदर्शनानंतर सिराजने जर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर प्रभाव पाडला असेल, तर त्याला विश्वचषक केळण्याची संधी नक्कीच मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत एमडब्लूटीए पीवायसी, टीएफएल, गोल्डन बॉईज उपांत्यपूर्व फेरीत
इंग्लंडने मारलं ऑस्ट्रेलियाचं मैदान! 11 वर्षांनंतर विरोधी संघाच्या धरतीवर जाऊन त्यांनाच चारली धूळ