रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्वरकोकिळा आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांचा भावनिक क्षण सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जनाईने सिराजला राखी बांधली आणि दोघांनी हा खास क्षण व्हिडिओद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवला.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर दोघांच्या फोटोमुळे त्यांच्यातील नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी दोघांनीही स्पष्ट केले की ते ‘भाऊ-बहीण’ आहेत. जनाईने “माझा प्यारा भाऊ” असं कॅप्शन टाकलं, तर सिराजने “माझी प्यारी बहिण, एक हजारों में” असं उत्तर देत नात्याची पवित्रता अधोरेखित केली.
पाहा व्हिडिओ-
या हृदयस्पर्शी क्षणावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतनेसुद्धा हार्ट इमोजीद्वारे शुभेच्छा दिल्या.
इंग्लंड दौऱ्यावर सिराजने उत्कृष्ट कामगिरी करत 5 कसोटीत 23 बळी घेतले. जसप्रीत बुमराह फक्त तीन कसोट्यांमध्ये खेळला असताना, सिराजने आघाडीची भूमिका बजावत भारताला 2-2 अशी मालिकेत बरोबरी साधून दिली. यानंतर सर्व माजी क्रिकेटपटूंनी सिराजच्या जिद्दीचं आणि तडफदार गोलंदाजीचं कौतुक केलं.
दरम्यान आता रक्षाबंधनाच्या या गोड क्षणातून आणि मैदानावरील जिद्दीमुळे सिराज सध्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.






