सध्या भारत विरूद्ध ऑस्टेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. तत्पूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) काही काळ विकेट घेण्यासाठी संघर्ष करत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सुमारे 1 वर्ष सिराज कसोटीत लयमध्ये दिसत नव्हता. न्यूझीलंड मालिकेदरम्यान त्याला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, ऑस्ट्रेलियात सिराज फाॅर्ममध्ये दिसला. त्याने चकमदार गोलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सिराजने 5 विकेट्स घेतल्या. पुन्हा एकदा तो शून्यातून हिरो ठरला. दरम्यान त्याने आपल्या यशाचे आणि शानदार पुनरागमनाचे रहस्य उघड केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जगातील दिग्गज गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहशी बोलल्याचा फायदा झाल्याचे सिराजने सांगितले. त्याचे श्रेयही त्याने नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांना दिले.
पंतप्रधान इलेव्हनविरूद्धच्या सराव सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर सिराज म्हणाला, “मी जस्सी भाईशी (जसप्रीत बुमराह) नेहमी बोलत असतो. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीही मी त्याच्याशी माझ्या गोलंदाजीबद्दल बोललो होतो. त्याने मला विकेट घेण्यास उत्सुक नसावे आणि एका भागात सतत गोलंदाजी करत राहण्यास सांगितले. आपल्या खेळाचा आनंद घ्या. तरीही तुला विकेट मिळत नसतील तर माझ्याशी बोल.”
मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) नवीन गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांच्याशी काय संभाषण केले ते सांगितले. सिराज म्हणाला, “मॉर्ने मॉर्केल मला सांगत होते की तू योद्धा आहेस. तू आम्हाला विकेट मिळवून देशील, पण तू तुझ्या गोलंदाजीचा आनंद घेत राहा. त्यामुळे मी माझ्या गोलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला आणि विकेट्सही घेतल्या.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; लिलावात अनसोल्ड ठरलेल्या 3 स्टार खेळाडूंना मिळू शकते संधी! कसं ते जाणून घ्या
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (टाॅप-5)
रोहित शर्मानं मन जिंकलं…केएल राहुलसाठी दिलं मोठं बलिदान