भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे .हा सामना दोन भारतीय खेळाडूंसाठी विशेष आहे. शुभमन गिल व मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनी या सामन्यातून आपले कसोटी पदार्पण केले आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. विशेषतः वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने उत्तम गोलंदाजी करत सर्वाची वाहवा मिळविली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये सिराजने अनेक बाबींचा खुलासा केला आहे.
मुलाखती दरम्यान सिराज म्हणाला, ‘भारतीय संघाची कसोटी कॅप मिळणे हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्षण आहे. मला अज्जू भाई (अजिंक्य रहाणे) आणि जस्सी भाई(बुमरहा) सोबत संभाषण करून बरे वाटले. अज्जू भाई सोबत चर्चा केल्याने माझा आत्मविश्वास वाढला.’
सिराजने सांगितले की तो गोलंदाजी करण्यासाठी व्याकूळ झाला होता, पण पहिल्या सत्रात त्याला गोलंदाजी मिळाले नाही. दुसऱ्या सत्रात जेव्हा त्याला गोलंदाजी मिळाली तेव्हा कर्णधार अजिंक्यने त्याला सांगितले की त्याला केवळ दोन षटकांसाठीच गोलंदाजी मिळाली आहे .
सिराज म्हणाला, ‘मी गोलंदाजी करण्यासाठी व्याकुळ झालो होतो. यानंतर जेव्हा मला अज्जू भाईने गोलंदाजी करण्यासाठी सांगितले, तेव्हा मी वॉर्मअप करत होतो. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की मी केवळ दोन षटकेच गोलंदाजी करणार आहे ‘.
सिराज आपल्या रणनीतीबद्दल बोलताना म्हणाला, ‘पहिल्या सत्रानंतर खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल बनली होती. त्यामुळे माझी योजना होती की डॉट बोल टाकून फलंदाजांवर दबाव वाढवला जावा.’
सिराजने या सामन्यातील पहिल्या डावात उत्तम गोलंदाजी करत 15 षटकांत 40 धावा देत 2 फलंदाजांना बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेच्या शतकानंतर कोहलीने केले कौतुक; ट्विट करत म्हणाला…
भारत वि. ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना सिडनीऐवजी मेलबर्नमध्ये? येत्या दोन दिवसात होणार निर्णय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारे भारतीय कर्णधार, ‘याने’ तब्बल ४ वेळा केलाय हा पराक्रम






