---Advertisement---

कशी नशिबानं थट्टा मांडली! धोनीचा हुकमी एक्का, २०१४चा पर्पल कॅप विजेता; यंदा बनलाय गुजरातचा ‘नेट बॉलर’

On: रविवार, मार्च 20, 2022 4:41 PM
Mohit-Sharma
---Advertisement---

यावर्षी इंडियन प्रीमियर लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामापूर्वी अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत आणि अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा सुरेश रैनाला १५ व्या हंगामात कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. तसेच मोहित शर्मा आणि त्याच्या कारकिर्दीत मोठा बदल पहायला मिळाला आहे. तो सध्या नेट बाॅलर झाला आहे. आता तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

मोहित शर्माला (Mohit Sharma) आयपीएल लिलावात एकाही फ्रॅंचायझीने विकत घेतले नाही. तो अनसोल्ड राहिला. मोहितसोबतच अनेक खेळाडूंचे आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. एकेकाळी मोहित शर्मा आयपीएलमधील चांगली कामगिरी करणारा खेळाडू होता, परंतु तो सध्या नेट बाॅलर बनला आहे. तो सीएसकेसाठी खेळताना २०१४ च्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला होता. तसेच, त्याने पर्पल कॅप आपल्या नावे केली होती.

आयपीएलच्या १५व्या हंगामात मोहित शर्माने आपली मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती, त्याच्यावर बोली न लागल्यानंतर गुजरात संघाने त्याला नेट बाॅलर म्हणून ठेवले आहे. मोहितने भारतीय संघासाठी २६ एकदिवसीय सामने, ८ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१ आणि टी२०मध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ८६ सामन्यात ९२ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल २०२२चा अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे ‘मदन लाल’

केकेआर संघासाठी बॅटिंग ऑर्डर बनली मोठी समस्या, श्रेयस अय्यर करणार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---