पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. हॅम्पशायरकडून पदार्पण करत असताना अब्बासने हॅटट्रिक घेत उत्तम कामगिरी बजावताना मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यात ९ बळी मिळवून संघाला विजय मिळवून दिला. मिडलसेक्सविरुद्धच्या पहिल्या डावात अब्बासने ६ बळी मिळवले तर, दुसर्या डावात त्याने ३ बळी घेत संपूर्ण सामन्यात ९ बळी आपल्या नावे केले.
काउंटी हंगामात पहिली हॅट्रीक घेणारा गोलंदाज
काउंटी क्रिकेटच्या या हंगामात मोहम्मद अब्बास हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बनला. गेल्या चार हंगामात हॅम्पशायरच्या तिसऱ्या पहिल्या गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली आहे. अब्बासच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हॅम्पशायरने या सामन्यात मिडलसेक्सचा २४९ धावांनी पराभव केला. पहिल्या डावात हॅम्पशायरने ३१९ धावा केल्या होत्या, ज्याला उत्तर म्हणून मिडलसेक्स संघ पहिल्या डावात फक्त ७९ धावा करू शकलेला.
सतरा चेंडूत गुंडाळला डाव
मोहम्मद अब्बासने हॅटट्रिक घेत केवळ १७ चेंडूत ५ गडी बाद केले. मिडलसेक्सला ७९ धावांवर बाद केल्यानंतर, हॅम्पशायरने दुसर्या डावात ४ बाद २९० धावा केल्यावर डाव घोषित करत, मिडलसेक्ससमोर ५३० धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, हॅम्पशायरच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा तुफान गोलंदाजी करत मिडलसेक्सचा दुसरा डाव २८१ धावांवर रोखला. अशाप्रकारे, हॅम्पशायरने २४९ धावांनी सामना जिंकला.
पदार्पणात केली संस्मरणीय कामगिरी
पाकिस्तानचा प्रमुख कसोटी गोलंदाज असलेला मोहम्मद अब्बास प्रथमच काउंटी क्रिकेट खेळत आहे. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ३१ षटके गोलंदाजी करून ३९ धावा देत ९ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये ९ निर्धाव षटके देखील टाकली गेलेली.
महत्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर मी…”, पृथ्वी शॉचा मोठा खुलासा
मोठी बातमी! हिथ स्ट्रिकनंतर आता श्रीलंकेच्या या क्रिकेटरवरही आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी