---Advertisement---

‘हा’ भारतीय खेळाडू सर्वाधिक दुर्लक्षित नायक, मोहम्मद कैफने मांडले परखड मत

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 12:48 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा जलदगतीचा गोलंदाज इशांत शर्मा याने बळींचे तिहेरी शतक झळकावले आहे. अर्थातच कसोटी क्रिकेट मध्ये ईशांत शर्मा याने ३०० गडी बाद करण्याचा कीर्तीमान आपल्या नावे केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असेलल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ईशांत शर्माने हा किर्तिमान आपल्या नावे केला.

ईशांत शर्मा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. आजच्या या कारनाम्याने त्याचे नाव दिग्गज गोलंदाजांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. यामुळेच त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मोहम्मद कैफ याने केले कौतुक

माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने ट्विट करत ईशांत शर्माचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “तो कधीच हार नाही मानत, तो कधीच तक्रार करत नाही. त्याच्याकडे इच्छाशक्तीची कमतरता नाहीये. ईशांत शर्मा भारतीय संघाचा सर्वात नम्र, आणि कमी गुणगान गायला गेलेला खेळाडू आहे. सर्वांनी उठा आणि ३०० गडी बाद केल्यामुळे त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करा. देशाने अशा खेळाडूंचा स्वीकार करण्याची आणि त्यांना सलाम करण्याची गरज आहे.”

भारतीय संघासाठी ३००पेक्षा अधिक गडी बाद करणारे गोलंदाज

ईशांत शर्मा व्यतिरिक्त पूर्व भारतीय जलद गोलंदाज कपिल देव आणि जहीर खान यांनीदेखील ३०० गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. तसेच ईशांत शर्मा हा कीर्तीमान करणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर फिरकी आणि वेगवान  गोलंदाजांमध्ये सहावा गोलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून अनिल कुंबले यांनी सर्वाधिक ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कपिल देव यांनी ४३४, हरभजन सिंग याने ४१७, आर. अश्विन याने ३८२, जहीर खान याने ३११ तर ईशांत शर्मा याने ३०० विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित सामन्यात कोहली किमान एक-दोन शतके नक्की ठोकेल, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

पुन्हा एकदा फ्लॉप झाल्याने रोहितवर भडकले नेटकरी, संघाबाहेर काढण्याचीही केली मागणी

आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---