आयपीएलच्या मैदानात मंगळवारी (16 मे) मार्कस स्टॉयनिस आणि मोहसिन खान यांच्यासह लखनऊ सुपर जायंट्सने चमकदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राउंडवर खेळलेल्या सामन्यात लखनऊने 5 धावांनी विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 11 धावा हव्या होत्या. मात्र, मोहसिन खान याच्या गोलंदाजीवर टिम डेविड आणि कॅमरून ग्रीन संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. हा सामना मोहसिन खानकडून त्याच्या वडिलांसाठी खऱ्या अर्थाने भेट ठरला.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजयासाठी लखनऊकडून 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण प्रत्युत्तरता मुंबईचा संघ 5 बाद 172 धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या षटकात कॅमगून ग्रीन आणि टिम डेविड एकही मोठा शॉट मारू शकले नाहीत. या षटकात गोलंदाजीला आलेल्या मोहसिन खान (Mohsin Khan) याने अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि लखनऊला 5 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयानंतरत लखनऊ प्लेऑफपासून अवघ्या एका पावलाच्या अंतरावर आहे. दुसरीकडे मुंबईला आता प्लेऑफसाठी इतर संघांच्या प्रदर्शनावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. दोन्ही संघांना लीग स्टेजमध्ये अजून प्रत्येक एक-एक सामना खेळायचा आहे.
“मी सराव सत्रात ज्या गोष्टी आमलात आणतो, त्याच सामन्यात करण्याचा माजा प्रयत्न होता. मी कृणाललाही ही गोष्ट बोललो होतो. रण अप देखील तोच होता. शेवटच्या षटकातही मी तो बदलला नाही. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे धावफलक पाहिला नाही आणि 6 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकले. खेळपट्टीवर चेंडूल चांगली पकड मिळत असल्याने मी संथ गतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.”
“माझ्यासाठी हा काळ कठीण होता, कारण मी स्वतः दुखापतग्रस्त होतो आणि एका वर्षानंतर खेळत होतो. माझे वडील काल आयसीयूमधून बाहेर आले. मागच्या 10 दिवसांपासून ते रुग्णालयात होतो आणि त्यांच्यासाठी मी ही कामगिरी केली. त्यांना हा सामना पाहिला असेल. संघाचा सपोर्ट स्टाफ गौतम (गंभीर) सर, विजय (दहिया) सर यांचा आभारी आहे. मागच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नव्हती तरीही त्यांनी मला हा सामना खेळण्याची संधी दिली,” असेही मोहसिन यावेळी म्हणाला.
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मार्कस स्टॉयनिस याने 47चेंडूत नाबाद 89 धावा केल्या. यासाठी स्टॉयनिसला सामनावीर देखील निवडले गेले. स्टॉयनिससोबतच लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या यानेही 49 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी संगाला चांगली सुरुवात दिली. पण नंतरचे फलंदाज अपेक्षित खेळी करू शकले नाहीत. टिम डेविडने नाबाद 32, तर कॅमरून ग्रीनने नाबाद 4 धावा केल्या. रोहितने 25 चेंडूत 37, तर ईशानने 39 चेंडूत 59 धावा केल्या. (Mohsin Khan’s father was in the ICU till a day before the victory against MI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितचा ट्रेडमार्क! तुम्हीही पाहा चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा पूल शॉट
मोहसिन खानच्या जोरावर लखनऊने मुंबईला चारली पराभवाची धूळ, प्ले-ऑफचे तिकीट अजूनही दूर