गेल्या काही दिवसांपूर्वी बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याने पंचासोबत वाद घातल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत घडला होता. त्यानंतर महमुदुल्लाहसोबत घडलेल्या प्रकरणानंतर पंच मोनिरुज्जमां यांनी टोकाची भूमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे.
मोनिरुज्जमां आणि मोर्शेद अली खान या दोन्ही पंचांचा आयसीचीसीच्या इमर्जिंग पॅनलमध्ये समावेश आहे. परंतु ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत घडलेल्या प्रकरणानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Moniruzzaman stepped down as a umpire)
क्रिकबजसोबत चर्चा करताना मोनिरुज्जमां यांनी म्हटले की, “माझ्यासाठी आता हे खूप झाले आहे. मला आता पंचगिरी करायची नाही. माझाही स्वाभिमान आहे. मला स्वाभिमानाने जगायचं आहे. महमुदुल्लाह आणि शाकिब अल हसन यांनी हा निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. पंचांकडूनही चूक होते. परंतु आमच्यासोबत जर असा व्यवहार केला गेला, तर पंचगिरी करण्यात काहीच अर्थ राहत नाही. मी फक्त पैसा कमवण्यासाठी पंचगिरी करत नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “ज्यावेळी शाकिब अल हसनने गैरवर्तणूक केली होती. तेव्हा मी मैदानावर नव्हतो. परंतु महमुदुल्लाहने जेव्हा गैरवर्तणूक केली तेव्हा मी तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडत होतो. हा प्रकार मी अगदी जवळून पाहिला. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. ते पाहून मी पंचगिरी न करण्याच्या निर्णय घेतला. मी पीसीबीचा कर्मचारी नाही आणि पंचांच्या बोर्डाकडून जो पैसा येतो तो मी घेऊ शकत नाही. माझे या खेळावर खूप प्रेम होते. मला फक्त सामना फी मिळत होती. मी नशीबवान आहे की, माझ्यासोबत आतापर्यंत तरी काही घडले नाही. परंतु कोणास ठाऊक कोणीतरी तुम्हाला अपमानित करेल आणि मला हे होऊ द्यायचे नाही.”
गाजी टँक क्रिकेटर्स संघाचा कर्णधार महमूदुल्लाह याने प्राईम बँक क्रिकेट क्लब संघासोबत झालेल्या सामन्यात, पंचांकडे मागणी केली असता ती पंचांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर संतापात येऊन महमूदुल्लाह शेजारी असलेल्या खेळपट्टीवर जाऊन झोपला होता.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड वि श्रीलंका: पहिल्या वनडेत श्रीलंकेची नामुष्कीजनक हार, ख्रिस वोक्सची भेदक गोलंदाजी
‘या’ कारणामुळे धोनीला मिळाला नाही निरोपाचा सामना, माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा
भारताच्या प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्रींची होणार उचलबांगडी? ‘या’ गोष्टी ठरणार कारणीभूत