---Advertisement---

‘तू भारतीय नाही, पैशांसाठी देश सोडला’, शेतकरी कृषी कायद्याविषयी बोलणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूवर चाहत्यांची टीका

On: शुक्रवार, डिसेंबर 11, 2020 11:02 AM
---Advertisement---

भारतीय संसदेत काही दिवसांपूर्वी कृषी कायद्यातील बदलांविषयीचे विधेयक बहुमताने पास झाले. विधेयक मंजूर झाल्यावर केंद्र सरकारने ते अंमलातही आणले. मात्र, या कायद्याला भारतातील शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे, तर या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारले. हजारोच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध दर्शवला. या आंदोलनाला अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला होता. यात भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग, कुस्तीपटू विजेंदर सिंग, युवराज सिंग याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा समावेश होता. मात्र, आता या आंदोलनात भारतीय वंशाच्या इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने उडी घेतली आहे.

माँटी पनेसरचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आवाज विदेशातही जाऊन पोहोचला. ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या काही भारतीय वंशाच्या लोकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यातच इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू माँटी पनेसरही या आंदोलनात सहभागी झाला.

त्याने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विटही केले होते. त्याने लिहिले होते की, “जर खरेदीदाराने शेतकऱ्यांना म्हटले की, करार पूर्ण होऊ शकत नाही कारण मला पिकाची गुणवत्ता मान्य नाही, तर त्या शेतकऱ्याला काय संरक्षण आहे? किंमत निश्चित केल्याचा त्यात उल्लेखही नाही?

त्याने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहनही केले होते.

लोकांनी पनेसरला केले ट्रोल 

माँटी पनेसरने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताच काही लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्याच्यावर निशाणा साधला. एका चाहत्याने म्हटले की, ‘तू भारतीय नाहीस. पैशांसाठी तू आमचा देश सोडून गेला होता.’

https://twitter.com/pankajyadav1261/status/1337101881173225472?s=19

 

ब्रिटनच्या पंतप्रधानांवर पनेसरने साधला निशाणा 

लोकांच्या टीकेनंतरही पनेसर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत राहिला. एव्हढेच नव्हे, तर त्याने ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सनवर निशाणा साधला. पनेसर म्हणाला की, ”व्यापार करारामुळे जॉन्सन मोदी सरकारला विरोध करणार नाहीत.”

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ! दुसऱ्या सराव सामन्यातून मोझेस हेन्रीक्स बाहेर; ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत

“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा

ट्रेंडिंग लेख-

शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---