प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (WPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी सर्व पाचही संघांच्या कर्णधारांची घोषणा झाली आहे. जगातील दुसरी सर्वात महागडी महिला क्रीडा लीग असलेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पाचपैकी तीन संघांचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू करताना दिसतील.
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम व डॉ. डी.वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी होतील. या स्पर्धेत पाच संघ खेळताना दिसणार आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही करेल. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे कर्णधारपद भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना ही भूषवेल. लीगमध्ये केवळ याच दोघी भारतीय कर्णधार असणार आहेत.
Captain. Leader. Legend 🙌
Congratulations, Meg Lanning on another incredible feat 👏#CapitalsUniverse #T20WorldCup #AUSvSA pic.twitter.com/AK8m7ASRv0
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 27, 2023
युपी वॉरियर्झ संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची अनुभवी यष्टीरक्षक एलिसा हिली करेल. त्यानंतर गुजरात जायंट्स संघाची कमान ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर बेथ मूनी ही सांभाळताना दिसणार आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सर्वात अनुभवी व ऑस्ट्रेलियाचे विद्यमान कर्णधार मेग लॅनिंग ही करेल.
लॅनिंग ही क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखली जाते. तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार टी20 व एक वनडे विश्वचषक जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात विजय संपादन केलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची ती कर्णधार होती. दुसरीकडे, हिलीला ऑस्ट्रेलियन संघाचे तसेच बिग बॅश लीगमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मात्र, मूनी प्रथमच कोणत्याही संघाचे नेतृत्व करेल.
(Mooney Healy And Lanning Lead WPL Teams Respectively Gujarat Giants UP Warriorz And Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद
आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ’हा’ संघ खातोय भाव