भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शनिवारपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावत भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. रोहितने पहिल्या डावात १६१ धावा काढून दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
रोहितचे विक्रमी शतक
काहीशा खराब झालेल्या खेळपट्टीवर रोहित शर्माने जिद्दीने फलंदाजी करत २३१ चेंडूत १६१ धावांची लाजवाब खेळी केली. यादरम्यान त्याने १८ चौकार व २ उत्तुंग षटकार लगावले. रोहितचे हे चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक आहे. भारताकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर (१००), विराट कोहली (७०) व राहुल द्रविड (४८) यांनी ४० पेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.
दीडशतकासह मिळवले दिग्गजांत स्थान
रोहितने १६१ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा बनवणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत तिसर्या स्थानी झेप घेतली. रोहितने आपल्या ४० आंतरराष्ट्रीय शतकांपैकी ११ शतकांवेळी १५० धावांची वेस ओलांडली आहे. त्यातील, चार वेळा कसोटी क्रिकेटमध्ये तर तब्बल सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५० पेक्षा अधिक धावांच्या खेळ्याकरणाऱ्या सलामीवीरांमध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अव्वलस्थानी आहे. त्याने १६ वेळ अशी कामगिरी केली होती. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यानेदेखील १२ वेळा १५० पेक्षा जास्त धावांच्या खेळ्या साकारले आहेत. या यादीमध्ये रोहितसह तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांचा क्रमांक लागतो.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेल्या ४० शतकांपैकी ७ शतके कसोटीत तर ३ शतके टी२० क्रिकेटमध्ये झळकावले आहेत. उर्वरित ३० शतके ही वनडे क्रिकेटमध्ये आली आहेत. रोहित असा एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
‘माझं सर्वात मोठं स्वप्न, विराटसोबत ओपनिंग करायची’, नवख्या खेळाडूने व्यक्त केली इच्छा