---Advertisement---

रोहित शर्माच्या पहिल्या चौकरातच विराट कोहली झाला भलताच खुश! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 8:12 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना चेन्नईच्या चेपोक स्टेडियमवर शनिवारी (१३ फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याचा पहिला दिवस रोहित शर्माने त्याच्या शानदार फलंदाजीने गाजवला. दरम्यान त्याच्या एका चौकारावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दाद दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा फलंदाजीला आला होता. त्याने तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध शानदार कव्हर ड्राईव्ह मारत चौकाराना धावांचे खाते उघडले. यावेळीत्याचा चौकार पाहून ड्रेसिंग रुम मध्ये बसलेला विराट कोहली खूपच खुश होताना दिसला. त्याच्या चौकारावर कोहली ड्रेसिंग रूम मध्ये ‘येस बॉय’ म्हणताना दिसला आणि हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर शेयर करताच चांगलाच व्हायरल झाला.

रोहितचं दिडशतक –

या सामन्यात रोहितने भारताच्या पहिल्या डावात सुरुवातीला आक्रमक खेळताना आणि नंतर भारताचा डाव सांभाळत शानदार दिडशतकी खेळी साकारली. रोहितने १३० चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पुढील ७८ चेंडूत १५० धावांचा टप्पाही पार केला. मात्र, दिडशतक करुन तो लगेचच बाद झाला. त्याने या डावात एकूण २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार मारले.

याबरोबरच रोहितने चेतेश्वर पुजाराबरोबर ८५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुजारा बाद झाल्यानंतर रोहितन रहाणेबरोबर १६२ धावांची भागीदारी केली. रहाणेने ६७ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाखेर भारताने ६ बाद ३०० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Valentines Week Special : हमारी अधुरी कहानी! १० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स

‘माझं सर्वात मोठं स्वप्न, विराटसोबत ओपनिंग करायची’, नवख्या खेळाडूने व्यक्त केली इच्छा

हो का? बरं… मग, ‘इग्लंड संघाला बाद करायला किती ओव्हर लागतील ते पण सांग!’ दोन दिग्गजांची ट्विटरवर जुंपली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---