जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात खेळला जाणार आहे. त्यापूर्वी क्रिकेट खेळणाऱ्या बलाढ्य देशांमध्ये कसोटी मालिका खेळवल्या जात आहेत. त्यापैकीच एक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळवली जात आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे, तर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. याचा फायदा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायन याला झाला. त्याने या सामन्यातील भारताच्या डावात खास विक्रम रचला.
भारताने गमावल्या 7 विकेट्स
दिल्ली कसोटी (Delhi Test) सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 78.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 263 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चहाच्या ब्रेकपर्यंत भारताने 62 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. अक्षर पटेल 28, तर आर अश्विन 11 धावांवर खेळत आहेत.
नेथन लायनचा विक्रम
भारताच्या ज्या 7 विकेट्स पडल्या आहेत, त्यातील 5 विकेट्स नेथन लायन याने घेत आपले विकेट्सचे पंचक (Nathan Lyon 5 Wicket Haul) पूर्ण केले. त्याने यावेळी 17.1 षटकात केएल राहुलची, 19.2 षटकात रोहित शर्माची, 19.4 षटकात चेतेश्वर पुजाराची, 25.2 षटकात श्रेयस अय्यरची आणि 50.5 षटकात केएस भरतची विकेट घेतली. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो सध्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक पूर्ण करणारा दुसरा सक्रिय फिरकीपटू ठरला. त्याने आतापर्यंत तब्बल 22 वेळा ही कामगिरी केली आहे.
Another 🐐 5-fa! #INDvAUS pic.twitter.com/u4QtVGIut6
— cricket.com.au (@cricketcomau) February 18, 2023
कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक घेणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) हा अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक 31 वेळा ही कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्थानी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन आहे. त्याने कसोटीत 19वेळा विकेट्सचे पंचक पूर्ण केले आहे.
कसोटीत सर्वाधिक वेळा विकेट्सचे पंचक घेणारे सक्रिय फिरकीपटू
31 वेळा- आर अश्विन
22 वेळा- नेथन लायन*
19 वेळा- शाकिब अल हसन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद
टीम इंडियाला खरंच भासतेय रिषभ पंतची गरज! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ‘या’ विक्रमात टॉपर आहे पठ्ठ्या