भारतीय संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. मागील वर्षीच्या अखेरीस पंतचा भीषण रस्ते अपघात झाला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. यात त्याच्या पाठीला, पायाला आणि डोक्याला जबर मार बसला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पंतने सोशल मीडियावर चालतानाचा पहिला फोटो शेअर केला होता.
महत्त्वाचं म्हणजे, सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटीत विजय मिळवून दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची खराब सुरुवात पाहून चाहत्यांना रिषभ पंत (Rishabh Pant) याची आठवण येत आहे. अशातच आकडेवारी समोर आली आहे, ज्यावरून समजते की, पंत भारतासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे.
रिषभ पंतचा विक्रम
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 (World Test Championship 2021-23) स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये पंत अव्वलस्थानी आहे. पंतने यादरम्यान तब्बल 7 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा चोपल्या आहेत. या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहेत. या दोघांनीही स्पर्धेत प्रत्येकी 6 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आहे. त्याने आतापर्यंत 5 वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. दिल्ली कसोटीत जडेजाने 50 धावांचा आकडा पार केला, तर तो या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी पोहोचेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) आहेत. दोघांनीही आतापर्यंत प्रत्येकी 4 वेळा ही कामगिरी केली आहे. (Most 50 plus scores for India in WTC 2021-23 Rishabh pant on the top)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावाकरणारे भारतीय
7- रिषभ पंत
6- श्रेयस अय्यर
6- चेतेश्वर पुजारा
5- रवींद्र जडेजा
4- केएल राहुल
4- रोहित शर्मा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर
स्टोक्सचा भीम पराक्रम! कसोटीत केली कुणालाही न जमलेली कामगिरी; प्रशिक्षक मॅक्युलमचाही विक्रम मोडला