सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह स्मिथ होय. स्मिथ सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात टिच्चून फलंदाजी करतोय. यादरम्यान स्मिथने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडत खास पराक्रम गाजवला आहे. तो आयसीसी बादफेरीत सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, यादीतील पहिली दोन नावे भारतीय आहेत.
काय आहे स्मिथचा विक्रम?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने बुधवारी (दि. 07 जून) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, ख्वाजा लवकर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. यावेळी वॉर्नर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याने 144 चेंडूंचा सामना करताना अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासोबतच त्याने खास पराक्रमही गाजवला.
स्टीव्ह स्मिथ आयसीसी बादफेरीत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत पाचव्यांदा अशी कामिगरी केली आहे. तो जॅक कॅलिस आणि कुमार संगकारा यांच्यासोबत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. कॅलिस आणि संगकारानेही प्रत्येकी 5 वेळा बादफेरीत सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
विराट-सचिन अव्वलस्थानी
मात्र, आयसीसी बादफेरीत सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहेत. विराट आणि सचिनने आतापर्यंत प्रत्येकी 6 वेळा अशी कामिगरी केली आहे. (Most 50 plus Scores in ICC Knockout matches steve smith 3rd in the list)
आयसीसी बादफेरीत सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणारे फलंदाज
6 – विराट कोहली
6 – सचिन तेंडुलकर
5 – स्टीव्ह स्मिथ*
5 – जॅक कॅलिस
5 – कुमार संगकारा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलच्या पहिल्या शतकाचा मानकरी ठरला हेड, 1 षटकार आणि 14 चौकार ठोकत रचला इतिहास
भरतने लंडनमध्ये दाखवली चित्त्याची चपळाई, खोऱ्याने धावा काढणाऱ्या वॉर्नरचा ‘असा’ काढला काटा, Video