fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अखेर ‘त्या’ यादीत रनमशिन विराट कोहली ठरला रोहित शर्माला सरस!

हैद्राबाद। काल(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला टी20(1st T20I) सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. याबरोबरच त्याने मोठा विश्वविक्रम केला आहे.

विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 23 वे अर्धशतक होते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी(Most 50-plus scores in T20Is) करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना रोहित शर्माला(Rohit Sharma) मागे टाकले आहे.

रोहितने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 22 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये रोहितच्या 4 शतकांचा आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे.

कालच्या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम रोहित आणि विराटच्या नावावर विभागून होता. कालच्या सामन्याआधी या दोघांनीही प्रत्येकी 22 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या होत्या. पण आता विराटने काल नाबाद 94 धावांची खेळी करत रोहितला मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 + धावांची खेळी करणारे खेळाडू-

23- विराट कोहली, सामने- 73

22- रोहित शर्मा, सामने- 102

17- मार्टिन गप्टील, सामने- 83

16 – पॉल स्टर्लिंग, सामने – 72

16 – डेव्हिड वॉर्नर, सामने – 76

 

You might also like