टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या असतील, तर तो खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा होय. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 296 धावा चोपल्या आहेत विराटने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही आपली लय कायम ठेवत शानदार फटकेबाजी केली. टी20 विश्वचषक 2022मधील दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला. या सामन्यात विराटने अर्धशतक साजरे करत आपली ताकद सर्वांना दाखवून दिली. यासोबतच त्याच्या नावावर खास विक्रमाचीही नोंद झाली.
भारताचा डाव
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाकडून फलंदाजी करताना हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी शानदार अर्धशतक साजरे केले. त्यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 168 धावा चोपल्या.
यामध्ये विराट कोहली याने 40 चेंडूत 50 धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. विराटने या धावा चोपताना 1 षटकार आणि 4 चौकारही मारले. हे विराटचे या स्पर्धेतील चौथे अर्धशतक होते. या अर्धशतकामुळे विराट आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक 50 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थानी पोहोचला. विराटने अवघ्या 12 डावांमध्ये एकूण 6 वेळा 50 हून अधिक धावांची खेळी साकारली आहे.
FIFTY for @imVkohli 👏👏
This is his fourth half-century in the #T20WorldCup 2022.
Live – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/1YuFExAhmg
— BCCI (@BCCI) November 10, 2022
या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा असून त्याने 5 वेळा अशी कामगिरी केली आहे. त्याला ही कामगिरी करण्यासाठी एकूण 16 डावांची गरज पडली. यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी तीन खेळाडू आहेत. यामध्ये सौरव गांगुल (6 डाव), जॅक कॅलिस (8 डाव) आणि सचिन तेंडुलकर (10 डाव) यांचा समावेश आहे. (Most 50+ scores in ICC semi-finals and finals virat top in the list)
आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करणारे खेळाडू
6 वेळा- विराट कोहली (12 डाव)*
5 वेळा- कुमार संगकारा (16 डाव)
4 वेळा- सौरव गांगुली (6 डाव)
4 वेळा- जॅक कॅलिस (8 डाव)
4 वेळा- सचिन तेंडुलकर (10 डाव)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ने टी20 विश्वचषक 2022मध्ये केली खराब कामगिरी, एक अर्धशतक सोडले, तर सगळीकडे ठरलाय फ्लॉप
टी20 विश्वचषकात नुसता फ्लॉप ठरलाय केएल राहुल, कामगिरी पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात