नागपूर। रविवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात तिसरा आणि आणि निर्णायक टी20 सामना(3rd T20I) पार पडला. या सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात भारताकडून युवा फलंदाज श्रेयस अय्यरने(Shreyas Iyer) आक्रमक फटकेबाजी करताना 33 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. याबरोबरच त्याने बांगलादेश विरुद्धच्या या मालिकेत 3 सामन्यात मिळून 8 षटकार मारण्याचाही पराक्रम केला आहे.
त्यामुळे तो या मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे. या टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अय्यर पाठोपाठ भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आहे. रोहितने या मालिकेत 6 षटकार मारले आहेत.
त्याचबरोबर एका द्विपक्षिय टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीतही अय्यर युवराज सिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. युवराजने 2012 ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत 8 षटकार मारले होते.
या यादीत अव्वल क्रमांकावर 11 षटकारांसह रोहित आहे. रोहितने 2017 ला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या द्विपक्षिय टी20 मालिकेत 11 षटकार मारले होते. तसेच रोहित पाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्यानेही 2017 ला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतच 9 षटकार मारले होते.
#भारत-बांगलादेश 2019 टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
8 – श्रेयस अय्यर
6 – रोहित शर्मा
3 – मोहम्मद नाईम / सौम्य सरकार
#एका द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –
11 – रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, 2017)
9 – केएल राहुल (विरुद्ध श्रीलंका, 2017)
8 – युवराज सिंग (विरुद्ध पाकिस्तान, 2012)
8 – श्रेयस अय्यर (विरुद्ध बांगलादेश, 2019)
टीम इंडियाच्या या तीन गोलंदाजांनी हॅट्रिक घेत गाजवले २०१९ चे वर्ष!
वाचा👉https://t.co/1XSy3wkfbL👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #deepakchahar #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019
हे आहेत भारताकडून पहिली कसोटी, वनडे आणि टी२०मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज
वाचा👉https://t.co/qEFP9Atg3d👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #deepakchahar #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 11, 2019