---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेला पुरून उरलाय इशान, गांगुली अन् रोहितलाही न जमलेला पराक्रम पठ्ठ्यानं दाखवलाय करून

On: रविवार, ऑक्टोबर 9, 2022 10:16 PM
Ishan-Kishan
---Advertisement---

रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. पहिल्या सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. भारताने हा सामना 7 विकेट्सने आपल्या खिशात घातला. आता मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. असे असले, तरीही भारतीय संघाचा युवा खेळाडू इशान किशन चांगलाच चमकला. यावेळी त्याला शतक करण्यात 7 धावा कमी पडल्या. मात्र, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खास पराक्रम गाजवला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार केशव महाराज (Keshav Maharaj) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 278 धावा केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 45.5 षटकात 3 विकेट्स गमावत 282 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना इशान किशन (Ishan Kishan) याने 84 चेंडूत 93 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 7 षटकारांची बरसात केली.

https://twitter.com/BCCI/status/1579119852593508352

किशनने पाडलेल्या षटकारांच्या पावसामुळे त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका वनडे डावात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. विशेष म्हणजे, तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला. त्याने संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असलेल्या सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांना पछाडले. गांगुली आणि रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका वनडे डावात फलंदाजी करताना सर्वाधिक 6 षटकार भिरकावले होते. या यादीत अव्वलस्थानी युसूफ पठाण आहे. युसूफने या संघाविरुद्ध फलंदाजी करताना सर्वाधिक 8 षटकारांची बरसात केली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका वनडे डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
8 षटकार- युसूफ पठाण
7 षटकार- इशान किशन*
6 षटकार- सौरव गांगुली
6 षटकार- रोहित शर्मा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शानदार श्रेयस! बहारदार शतकासह अय्यरने कायम राखला ‘गोल्डन फॉर्म’
जोडी जबरदस्त! श्रेयस-इशानने दक्षिण आफ्रिकेची पिसे काढत रचला नवा इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---