---Advertisement---

आयपीएल २०२०: आयपीएलच्या सर्व संघातील वयस्कर मोहरे; काहींनी तर गाठलीय वयाची चाळीशी

On: सोमवार, ऑगस्ट 24, 2020 8:04 PM
---Advertisement---

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) तेरावा हंगाम पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत खेळली जाणारी ही लीग ५३ दिवस चालणार आहे. १० नोव्हेंबरला आयपीएल २०२०चा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

आयपीएलची विशेषता ही आहे की, आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील नियमित खेळाडूंबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील युवा खेळाडूदेखील सहभागी होताना दिसतात. यामुळे अनेक दिग्गजांच्या छत्रछायेखाली युवा खेळाडूंना नवनव्या गोष्टी शिकायला मिळतात.

या लेखात, आयपीएल २०२०मधील सर्व संघांमध्ये वयाने सर्वात मोठ्या असणाऱ्या म्हणजे संघातील सर्वात वयस्कर खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात, आयपीएलच्या सर्व संघातील सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत कोणकोणत्या खेळाडूचे नाव येते? Most Aged Players From All IPL Teams

चेन्नई सुपर किंग्स – इम्रान ताहिर (४१ वर्षे) 

दक्षिण आफ्रिकाचा माजी फिरकीपटू गोलंदाज इम्रान ताहिर याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने २०११पासून ते २०१९पर्यंत दक्षिण आफ्रिका संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २९३ विकेट्सची नोंद आहे. यात त्याच्या वनडेतील १७३ विकेट्स, टी२०तील ६३ विकेट्स आणि कसोटीतील ५७ विकेट्सचा समावेश आहे.

ताहिरने त्याचे वाढते वय पाहता गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ताहिरने वयाची चाळिशी पार केली आहे. तो आता ४१ वर्षाचा आहे. आयपीएलमधील सर्व संघांमध्ये यवर्षी तो सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे. त्यामुळे ताहिरला आयपीएल २०२०मधील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणण्यास हरकत नाही.

ताहिर हा दमदार फिरकीटपटू गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५५ सामने खेळत ७९ विकेट्स पटकावल्या आहेत. जरी, त्याने वयाची चाळीशी ओलांडली असली, तरी त्याची गोलंदाजी तेवढीच दमदार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब – ख्रिस गेल (४० वर्षे) 

वेस्ट इंडिज संघाच्या सर्वात खतरनाक फलंदाजांपैकी एक ख्रिस गेल हा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. ‘युनिव्हर्सल बॉस’ गेल हा आयपीएलसोबत कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही त्याचा जलवा दाखवताना दिसतो.

यंदा किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग असेलला गेल यापुर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडून खेळला आहे. गेलची आयपीएल कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२५ सामने खेळत ४४८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ शतकांचा समावेश आहे. गेल्या २ हंगामांपासून किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणारा गेल हा सध्या ४० वर्षाचा झाला आहे. तो पंजाब संघातील सर्वाधिक वय असलेला खेळाडू आहे.

दिल्ली कॅपिटल्स – अमित मिश्रा (३७ वर्षे) 

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा हा पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलमध्ये जास्त सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवात करणारा मिश्रा हा काही काळ डेक्कन चार्जर्स संघाचा भाग होता. पण त्याची पुन्हा दिल्ली कॅपिटल्स संघात निवड करण्यात आली आहे.

तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो दिल्ली संघातील सर्वाधिक वय असणारा खेळाडू आहे. त्याचे वय आता ३७ वर्षे आहे.

मिश्राने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४७ सामने खेळत १५७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – डेल स्टेन (३७ वर्षे) 

दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सर्वाधिक वय असणारा खेळाडू आहे. स्टेनने त्याच्या जिवनाचे ३६ वर्ष पूर्ण केले आहेत. तो आता ३७ वर्षांचा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी)कडून खेळण्यापुर्वी स्टेन हा डेक्कन चार्जर्स आणि सनरायजर्स हैद्रबाद संघाचा भाग होता. वेगवान गोलंदाजी हे त्याचे प्रमुख हत्यार आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९२ सामने खेळत ९६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स – लसिथ मलिंगा (३६ वर्षे) 

क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट यॉर्कर गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या लसिथ मलिंगाला जगातील सर्वोत्कृष्ट टी२० गोलंदाज समजले जाते. मलिंगाची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आकडेवारी प्रशंसनीय आहे. त्याने वनडेत २२६ सामन्यात ३३८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी२०त ८३ सामन्यात १०७ विकेट्स चटकावल्या आहेत.

आपल्या गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांचा धूळ चारणाऱ्या मलिंगाने आयपीएलमध्ये १२२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १७७ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा हा दमदार गोलंदाज आता ३६ वर्षांचा झाला आहे. तो मुंबई इंडियन्समधील सर्वाधिक वय असणारा खेळाडू आहे.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (३५ वर्षे) 

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला गतवर्षीच्या विश्वचषकानंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताकडून जरी या खेळाडूला जास्त संधा मिळाली नसली तरी, आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. गेल्या २ हंगामांपासून केकेआरचा भाग असणारा दिनेश हा संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तो आता ३५ वर्षांचा झाला आहे.

दिनेशने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १८२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २७.०७च्या सरासरीने ३६५४ धावा केल्या आहेत.

सनराइजर्स हैद्राबाद – मोहम्मद नबी (३५ वर्षे) 

अफघानिस्तान संघाचे नाव काढले की, सर्वांच्या तोंडात पहिल्यांदा राशिद खानचे नाव येते. पण, अफघानिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी हादेखील खूप शानदार आणि उपयोगी खेळाडू आहे. तो यावर्षी आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग आहे.

नबीने आयपीएलमध्ये जास्त वर्षे क्रिकेट खेळले नाही. त्याने २०१७मध्ये आपले आयपीएल पदार्पण केले होते. नबीने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १३५ धावा आणि ११ विकेट्स घेतल्या आहेत. नबी हा सनराइजर्स हैद्राबाद संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याचे वय आता ३५ वर्षे आहे.

राजस्थान रॉयल्स – रॉबिन उथप्पा (३४ वर्षे) 

गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असणारा रॉबिन उथप्पा हा यावर्षी राजस्थान रॉयल्स संघात सामाविष्ट झाला आहे. ३४ वर्षीय उथप्पा हा राजस्थान संघातील सर्वात जास्त वय असणारा खेळाडू आहे. भारताकडून जास्त क्रिकेट खेळण्याची संधी न मिळेलल्या उथप्पाने आयपीएलमध्ये १७७ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ४४११ धावांची नोंद आहे.

ट्रेंडिंग लेख –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---