आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान येथे होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी जवळपास फक्त एक महिना उरला आहे. मात्र, स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप समोर आले नाहीये. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे. तसेच, या सामन्याच्या तारखेचीही चाहते प्रतीक्षा करत आहेत. वृत्तांनुसार, आशिया चषकाचे ड्राफ्ट वेळापत्रक समोर आले आहे.
स्पर्धेला कधी होणार सुरुवात?
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) 2 सप्टेंबर (2 September) रोजी भिडणार आहेत. हा सामना श्रीलंकेतील कँडी (Kandy) येथे होणार आहे. वृत्तांनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या उद्घाटनाची तारीख 30 ऑगस्ट बदलून 29 ऑगस्ट केली आहे. यानुसार, 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला श्रीलंकेतील कँडी येथे भारताविरुद्ध खेळायचे आहे. वृत्तांमध्ये असेही सांगितले जात आहे की, स्पर्धा मुल्तानमध्ये यजमान पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघांमधील सामन्याने सुरू होईल. तसेच, 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
पाकिस्तानच्या दोन शहरात होतील सामने
पीसीबीची मूळ योजना अशी होती की, पाकिस्तान त्यांचे सर्व 4 सामन्यांचे आयोजन एकाच शहरात करेल. मात्र, ज्यावेळी या महिन्याच्या सुरुवातीला नवीन अध्यक्ष जका अश्रफ यांच्या नेतृत्वात नवीन पीसीबीचा पदभार सांंभाळला, तेव्हा मुल्तान शहराचा दुसऱ्या स्थानाच्या रूपात समावेश करण्यात आला. ड्राफ्ट वेळापत्रकानुसार, लाहोर 3 सामन्यांचे, तर मुल्तान येथे पहिल्या सामन्याचे आयोजन केले जाईल.
स्पर्धेत खेळले जातील 13 सामने
स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील. हे सर्व सामने पाकिस्तानच्या नियमित वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होतील. अ गटात पाकिस्तानसोबत भारत आणि नेपाळ संघ आहेत. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ आहेत. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरतील. तसेच, या फेरीतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचतील. यावेळी आशिया चषक 50 षटकांचा खेळला जाणार आहे.
लवकरच होईल अधिकृत घोषणा
खरं तर, स्पर्धेचे ड्राफ्ट वेळापत्रक तयार आहे. स्पर्धेच्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा बुधवारी (दि. 19 जुलै) सायंकाळी केली जाऊ शकते. वेळापत्रक येताच तारखांबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम लागेल. (most awaited india vs pakistan match expected on 2nd september in asia cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
रसेलची मसल पावर! अमेरिकेत मारला स्पर्धेतील सर्वात लांब गगनचुंबी षटकार, पाहून डोळेच फिरतील
शेवटी दिवस बदललेच! युवा स्टार जयसवालने ठाण्यात घेतलं 5 BHKचं नवीन घर, आधी राहायचा भाड्याच्या घरात