आयपीएल २०२०मधील पहिल्या २४ सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. आयपीएल २०२०मध्ये एकही षटकार न मारता सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम केदारच्या नावावर झाला आहे.
केदारने आयपीएल २०२०मध्ये शनिवारपर्यंत ६ सामन्यातील ४ डावांत फलंदाजी करताना १९.३३च्या सरासरीने केवळ ५८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५९ चेंडूंचा सामना केला आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेटही ओघानेच ९८.३० असा राहिला आहे.
केदारपाठोपाठ या यादीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलचा नंबर लागतो. त्याने ५६ चेंडूत केवळ ४८ धावा करताना एकही षटकार मारलेला नाही. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक होता परंतू त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खणखणीत अर्धशतकी खेळी करताना २ षटकार मारले.
या यादीत मुरली विजय (४३), रॉबीन उथप्पा (४२) व रियान पराग (३०) यांचा क्रमांक लागतो.
आयपीएल २०२०मध्ये एकही षटकार न मारता सर्वाधिक चेंडू खेळणारे फलंदाज
५९- केदार जाधव
५६- ग्लेन मॅक्सवेल
४३- मुरली विजय
४२- रॉबीन उथप्पा
३०- रियान पराग
महत्त्वाच्या बातम्या-
”केवळ ‘या’ कारणामुळे आम्ही सामना गमावला” दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर स्मिथने दिली प्रतिक्रिया
रिषभ, अय्यर धावबाद झाले आणि दिल्लीने नोंदवला ‘हा’ नकोसा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून
शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू






