साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज पुन्हा एक विक्रम केला आहे. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २००वा झेल घेतला आहे.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर विराटने जाॅश बटलरचा जो झेल घेतला तो त्याचा कारकिर्दीतील २००वा झेल ठरला. या सामन्यापुर्वी त्याला हा पराक्रम करण्यासाठी २ झेलांची गरज होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (वनडे, कसोटी आणि टी२० मिळुन ) २०० झेल घेणारा तो जगातील ३०वा खेळाडू आहे. तसेच भारताकडून विराट सोडून २०० झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर आणि मोहम्मद अझरुद्दीनचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० झेल घेणारे भारतीय खेळाडू
३३४- राहुल द्रविड, सामने- ५०९
२६१- मोहम्मद अझरुद्दीन, सामने- ४३३
२५६- सचिन तेंडूलकर, सामने-६६४
२००- विराट कोहली, सामने- ३४३
तसेच सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ ५ खेळाडूंना हा पराक्रम करता आला आहे.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये २०० झेल घेणारे क्षेत्ररक्षक
३०१- राॅस टेलर, सामने- ३७०
२३०- ख्रिस गेल, सामने- ४४३
२०७- हशीम अमला, सामने- ३३२
२०५- अॅलस्टर कूक, सामने- २५६
२००- विराट कोहली, सामने- ३४३
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश
–पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम
– टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू
– चौथ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया
– भारत दौऱ्यासाठी विंडीज संघाची घोषणा
– पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा
–भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच






