धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या आयपीएल हंगामात आजपर्यंत एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. या विक्रमात त्याने अव्वलस्थान गाठले आहे. विशेष म्हणजे, 5 वर्षांनंतर आयपीएलमध्ये असा विक्रम पाहायला मिळाला आहे.
खलील अहमदचा विक्रम
आयपीएल 2023च्या 64व्या सामन्यात पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) संघ आमने-सामने होते. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 213 धावांचा डोंगर उभारला. यानंतर या आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी दिल्लीकडून पहिले षटक खलील अहमद (Khaleel Ahmed) टाकत होता. हे षटक खलीलने निर्धाव टाकले. त्यानंतर खलील पंजाबच्या डावातील तिसरे आणि स्वत:चे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातही त्याने पहिले पाच चेंडू निर्धाव टाकले. यातील चौथ्या चेंडूवर 1 धाव आली, पण ती लेग बायची होती. त्यामुळे खलील अहमदने सलग 11 चेंडू निर्धाव टाकले आणि खास विक्रम नावावर केला.
सलग 11 चेंडू निर्धाव
आयपीएल 2023 स्पर्धेत एकाही खेळाडूने अशी कामगिरी केली नव्हती. त्यामुळे तो या हंगामात सलग सर्वाधिक 11 चेंडू निर्धाव टाकणारा खेळाडू बनला. विशेष म्हणजे, हा आयपीएलमधील इतिहास ठरला. त्याच्यापूर्वी एकाही गोलंदाजाला 10पेक्षा अधिक चेंडू निर्धाव टाकता आले नव्हते.
सर्वप्रथम आयपीएल 2012मध्ये मॉर्ने मॉर्केल याने मुंबई इंडियन्सविरुद्ध सलग 10 चेंडू निर्धाव टाकले होते. त्यानंतर आयपीएल 2014मध्ये जयदेव उनाडकट याने किंग्स इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्स) संघाविरुद्ध सलग 10 चेंडू निर्धाव टाकले होते. त्यानंतर नेथन कुल्टर नाईल याने आयपीएल 2015मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आणि ट्रेंट बोल्ट याने आयपीएल 2018मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती. (Most consecutive dot balls bowled by a DC bowler Khaleel Ahmed in IPL)
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सलग निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज
11 वेळा- खलील अहमद, विरुद्ध- पंजाब किंग्स (2023)*
10 वेळा- ट्रेंट बोल्ट, विरुद्ध- कोलकाता नाईट रायडर्स (2018)
10 वेळा- नेथन कुल्टर नाईल, विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्स (2015)
10 वेळा- जयदेव उनाडकट, विरुद्ध- किंग्स इलेव्हन पंजाब (2014)
10 वेळा- मॉर्ने मॉर्केल, विरुद्ध- मुंबई इंडियन्स (2012)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ
4, 4 आणि 6: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या पृथ्वीची बॅट अखेर तळपलीच, अर्शदीपला चोप चोप चोपले; Video Viral






