आयसीसी महिला विश्वचषक २०२२ वा सामना सोमवारी (१४ मार्च) हॅमिल्टन येथे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. हा सामना बांगलादेश महिला संघाने ९ धावांच्या नजीकच्या फरकाने जिंकला. बांगलादेशविरुद्ध सामना गमावल्यानंतर पाकिस्तानच्या नावावर एक नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. महिला विश्वचषकात सर्वात जास्त सलग सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम पाकिस्तानच्या नावावर झाला आहे.
महिला वनडे विश्वचषकात पाकिस्तान (Pakistan) संघाला २००९ पासून ते २०२२ पर्यंत सलग १८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबाबतीत पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आहे. पाकिस्तानपाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नेदरलँड संघ असून त्यांनी १९८८ ते ९३ यादरम्यान सलग ९ वेळा पराभवाचा धक्का सहन केला होता. यानंतर तिसऱ्या क्रमांकावरही नेदरलँड संघच असून त्यांनी १९९७ ते २००० यादरम्यान सलग ८ वेळा पराभवाचा सामना केला होता. या नकोशा विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा नेदरलँड संघ आहे. त्यांनी १९९३ ते ९७ यादरम्यान सलग ७ वेळा पराभव पत्करला होता. यानंतर पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघ असून त्यांनी २००५ ते ०९ दरम्यान सलग ७ वेळा पराभव पत्करला होता.
सामन्याबद्दल थोडक्यात
पाकिस्तान आणि बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) संघातील सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला निर्धारित ५० षटकात ९ विकेट्स गमावत २२५ धावाच करता आल्या. यावेळी पाकिस्तानच्या सिद्रा अमीनने शतकी खेळी केली. तिने १४० चेंडूंचा सामना करताना ८ चौकार ठोकत १०४ धावा केल्या.
यावेळी बांगलादेश संघाकडून गोलंदाजी करताना फाहिमा खातून हिने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, रुमाना अहमदने २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त जहनारा आलम आणि सलमा खातून यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महिला वनडे विश्वचषकात सर्वाधिकवेळा पराभवाचा सामना करणारे संघ-
१८*- पाकिस्तान (२००९- २२)
०९- नेदरलँड (१९८८- ०३)
०८- नेदरलँड (१९९७- ००)
०७- नेदरलँड (१९९३- ९७)
०७- दक्षिण आफ्रिका (२००५- ०९)
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे रणजी ट्रॉफीत २६६ धावा कुटणारा झारखंडचा पठ्ठ्या? पाकिस्तानी दिग्गजालाही ठरलाय वरचढ
दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सुस्साट, इंग्लंडला ९ धावांनी झुकवत नोंदवली विजयाची हॅट्रिक
महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’