मेलबर्न। भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीमागे तीन झेल घेतले आहेत, त्यामुळे कसोटी पदार्पणाच्या पहिल्या वर्षात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ब्रॅड हॅडिन यांच्या विश्वविक्रमाची पंतने बरोबरी केली आहे.
त्याने यावर्षी ऑक्टोबरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या नॉटिंगघम कसोटीतून पदार्पण केले होते. त्याने यावर्षी कसोटीमध्ये ८ सामन्यात खेळताना १६ डावात यष्टीमागे ४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने हॅडीन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. हॅडीनने २००८ ला कसोटी पदार्पण करताना त्यावर्षी ११ सामन्यातील २२ डावात यष्टीमागे ४२ विकेट्स घेतल्या होत्या.
याबरोबरच एका कसोटी मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतही पंतने अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी मालिकेत यष्टीमागे २० विकेट्स घेतल्या आहेत. याआधी हा विक्रम नरेन ताम्हाणे आणि सईद किरमानी यांच्या नावावर होता.
ताम्हाणे यांनी पाकिस्तान विरुद्ध १९५४/५५ मध्ये यष्टीमागे १९ विकेट्स घेतल्या होत्या. तर सईद किरमानी यांनी पाकिस्तान विरुद्धच १९७९/८० मध्ये १९ विकेट्स यष्टीमागे घेतल्या होत्या.
कसोटी पदार्पणाच्या वर्षात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक –
४२ विकेट्स – ब्रॅड हॅडीन (२००८)
४२ विकेट्स – रिषभ पंत (२०१८)
३६ विकेट्स – पिटर नेविल (२०१५)
३५ विकेट्स – केविन राईट (१९७९)
एका कसोटी मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय यष्टीरक्षक –
२० विकेट्स – रिषभ पंत (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१८/१९)
१९ विकेट्स – नरेन ताम्हाणे (विरुद्ध पाकिस्तान, १९५४/५५)
१९ विकेट्स – सईद किरमानी (विरुद्ध पाकिस्तान, १९७९/८०)
१७ विकेट्स – एमएस धोनी (विरुद्ध विंडीज, २००६)
१७ विकेट्स – एमएस धोनी (विरुद्ध इंग्लंज, २०१४)
महत्त्वाच्या बातम्या:
–ही दोस्ती तुटायची नाय! शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी
–कर्णधार कोहली आणि नाणेफेकीच नातं जगावेगळं
–भारताचा १५०वा कसोटी विजय, या देशाला पाजले सर्वाधिक वेळा पाणी